*कोंकण Express*
*परमहंस भालचंद्र महाराज यांचा 120 वा जन्मोत्सव सोहळा 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये होणार संपन्न*
*कणकवली ः संजना हळदिवे*
कणकवली शहरातील परमहंस भालचंद्र महाराज यांचा १२० वा जन्मोत्सव सोहळा २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२४ या कालावधी मध्ये होणार आहे. या निमित्ताने बाबांची पालखी ज्या मार्गावरून जाणार आहे त्या नागरीकांकरीता घर सजावट स्पर्धेचे आयोजन परमहंस भालचंद्र महाराज संस्थान, कणकवली यांच्या सहकार्याने व नमो भालचंद्राय ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने जन्मोत्सव कालावधी २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०१४ या ५ दिवसात स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे.
स्पर्धेविषयी माहीती, नियम व अटी
१) स्पर्धेचा कालावधी दि. २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२४
२) स्पर्धेत सहभागी होणान्या स्पर्धकांनी आपल्या परिसरातील सजावट करणे व स्वच्छता ठेवणे.
३) सजावटीत विद्युत रोषणाई व कंदील रोषणाई पाचही दिवस चालू असणे आवश्यक आहे. (शक्यतो भालचंद्र बाबांचा फोटो अथवा चित्र असलेला कंदिल वापरणे, दररोज दारासमोर विविध प्रकारची रांगोळी काढणे) ४) स्पर्धेत सलग ५ दिवस भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास १०० गुण दिले जातील, पहिल्या दिवशी सादरीकरणास २५ गुण, दुसऱ्या दिवशी १५ गुण, तिसऱ्या दिवशी १० गुण व सादरीकरणास ५० गुण (प्रत्येक दिवशी १० गुण याप्रमाणे गुण दिले जातील.)
५) पाचही दिवस परिसर व घरासमोरील स्वच्छतेसाठी विशेष मार्क देण्यात येतील
६) स्पर्धा कालावधीत दररोज सायं. ७ ते ९ या वेळात परिक्षणार्थ परिक्षकांची फेरी होईल,
७ ) १ फेब्रुवारी रोजी बाबांची मिरवणूक देवळात पोहचल्यानंतर स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण कार्यक्रम होईल
८ ) घर सजावट स्पर्धेला प्रथम क्रमांक ७,७७७/-, व्दितीय क्रमांक ६.६६६/-, तृतीय क्रमांक ५,५५५/-, चौथा क्रमांक ४,४४४/-, पाचवा क्रमांक ३.३३३/- तसेच उत्तेजनार्थ १- १,१११/-, उत्तेजनार्थ २- १,१११/-, उत्तेजनार्थ ३- १.१११/- अशी अनुक्रमे बक्षिसे देण्यात येतील.
९ ) परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील
एका पेक्षा अधिक प्रेक्षकांचे निरीक्षण हे परिक्षकाच्या निरीक्षणासोबत तंतोतंत जुळत्यास लकी ड्रॉ पध्दतीने विजेता ठरविण्यात येईल.
पहिला क्रमांक बक्षीस
७,७७७ /-
संतोष पुजारे कणकवली
दुसरा क्रमांक बक्षीस
६,६६६/-
मिथील दळवी, कणकवली कोकण रेल्वे कॉन्ट्रॅक्टर
तीसरा क्रमांक बक्षीस
५,५५५
सुशांत उर्फ बाबू नाईक (माजी गट नेते, नगरपंचायत कणकवली) कन्हैया पारकर (माजी नगरसेवक, नगरपंचायत कणकवली)
चौथा क्रमांक बक्षीस
४,४४४/-
साई ट्रेडर्स, श्री. हनुमंत अंबाजी इंगळे, कणकवली ९४०५३२५२५२
पाचवा क्रमांक बक्षीस
३,३३३/-
अबिद नाईक माजी नगरसेवक, नगरपंचायत कणकवली
उत्तेजनार्थ (एक)
१,१११/-
हॉटेल वेदांत श्री. संदिप आचरेकर, कणकवली
उत्तेजनार्थ (दोन)
१,१११/-
हॉटेल वेदांत श्री. संदिप आचरेकर, कणकवली
उत्तेजनाथ (तीन)
१,१११/-
वेदा जनरेटर
श्री. विन् महाडीक, कणकवली
प्रत्येकी सन्मानचिन्ह- श्री. विजय मन्याप्पा इंगळे, कणकवली यांजकडून
सुजाण प्रेक्षक – १,१११ श्री. मिलिंद मेस्त्री, माजी उपसभापती, पंचायत समिती, कणकवली
या सर्व स्पर्धेचे आयोजन श्री उमेश सहदेव वाळके
आयोजक
परमहंस भालचंद्र महाराज संस्थान कणकवली व नमो भालचंद्राय ग्रुप