*कोंकण Express*
*गटविकास अधिकारी कणकवली यांच्या लेखी आश्वासनानंतर फोंडाघाट ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले*
*कणकवली ः प्रतिनिधी*
फोडापाट येथील एका शासकीय जमिनीमध्ये असलेली मंदिर इमारत एका व्यक्तीच्या नावे असल्याचे ती निदर्शनास आले आहे. याबाबत ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे माहितीच्या अधिकारात विचारणा केली असता सदरची इमारत त्या व्यक्तीच्या नावे कशी लागली, याची कोणतीही कागदोपत्री माहिती उपलब्ध नाही याबाबत गावचे ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई हामी सदर व्यक्तीच्या नावाची बेकायदेशीर नोंद रद्द व्हावी अन्यथा २६ जानेवारीला, प्रजासत्ताकदिनी सकाळी ८ वा पासून कणकवली पंचायत समितीसमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा फोडाघाट येथील काही ग्रामस्थांतर्फ गटविकास अधिकारी, कणकवली पोतीस निरीक्षक आदीना निवेदनाद्वारे दिला होता.
निवेदनात म्हटले आहे, फोंडाघाट येथे शासकीय जमिनीमध्ये एक मंदिर इमारत आहे. या इमारतीचे २०००, २००१ व त्यापासून आजपर्यंतचे असेसमेंट उतारे पाहिले असता इमारत एका व्यक्तीच्या नावे असल्याचे निदर्शनास आले आहे. शासकीय जमिनीमध्ये असलेल्या मंदिर इमारतीच्या असेसमेंट लिस्ट उत्तान्यावर मालक म्हणून कोणत्याही व्यक्तीचे वैयक्तिक नाव कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे याबाबत ग्रामविकास अधिकारी फोडाघाट पांच्याकडे माहितीचा अर्ज सादर करून सदर इमारतीच्या ग्रा. पं. कर आकारणी अभिलेखात त्या व्यक्तीचे नाव नोंद होण्याकरिता त्यांनी फोडाघाट ग्रामपंचायतीकडे केलेले अर्ज, निवेदन तसेच ग्रा. पं. मासिक सभेत ठराव आदीची माहिती आम्ही मागितली होती मात्र, ही माहिती फोडाघाट ग्रा. पं. च्या दप्तरी, अभिलेख्यावर उपलब्ध नाही. तसेच माहिती उपलब्ध नसल्याची कारणमीमांसा देखील देण्यात आलेली नाही.याबाबत कर्तव्यात क्रमूर केल्याप्रकरणी सरपंच व ग्रामविकला अधिकारी यांची प्रशासकीय वरिष्ठ स्तरापरून प्राथमिक चौकशी करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे निवेदनात हिरबा विश्वनाथ सावंत श्यामसुंदर अंकुश सावंत सत्यवान वासुदेव सावत, प्रताप चंद्रकांत सावंत, प्रदीप चंद्रकांत सावत, नामदेव अनंत लाड, रवींद्र पांडुरंग लाड, प्रमोद रामचंद्र लाइ विठ्ठल अनंत लाड, नीतेश लडू लाइ, जगदिश भास्कर सावंत पांच्या सहया आहेत.
तरी या साठी वारंवार विनंती वजा अपील करून देखील तथा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या लेखी कार्यवाही पत्रांना न जुमानता फोंडाघाट ग्रामदैवत श्री गांगो मंदिर इमारत क्रमांक 2765 शासकीय मालकी भूखंडावरील असेसमेंट वरील कोणत्याही अर्जाशिवाय व ठरावाशिवाय लावलेले वैयक्तिक व्यक्तीचे नाव कमी करण्यासाठी
उपोषण करता श्री हिरबा विश्वनाथ सावंत यांनी ग्रामपंचायत फोंडाघाटच्या विरोधात 26 जानेवारी दिनांक आज रोजी पंचायत समिती कणकवली येथे आमरण उपोषण केले होते.
सदर मागणी 8 दिवसात पूर्ण करतो असे काल दिनांक 25 रोजी ग्रामसेवक फोंडाघाट तथा ग्रामपंचायत सरपंच फोंडाघाट यांनी सांगितले परंतु तातडीने कार्यवाही होण्यासाठी आज रोजी आम्ही सर्व उपोषणास बसलो होते. या उपोषणानंतर आज गटविकास अधिकारी कणकवली यांच्या लेखी आश्वासनानंतर सर्व ग्रामस्थांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आणि उपोषण मागे घेतले.