*कोंकण Express*
*सिंधुदुर्गातील ४२ गावात ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी ४ कोटी मंजूर…*
*सिंधुरत्न योजनेतून तरतूद; शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांचा पुढाकार…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सिंधुरत्न योजने मधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल ४२ गावामध्ये ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी तब्बल ३ कोटी ९८ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या पुढाकारातून हा निधी उपलब्ध झाला आहे. यासाठी सदस्य माजी आमदार प्रमोद जठार आणि किरण सामंत यांनीही आपले अनुमोदन दिले आहे.