*कोंकण Express*
*कणकवली शिवसेना शाखेत आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांचा वाढदिवस साजरा*
*शिवसैनिकांनी वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा*
शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचा वाढदिवस आज आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली शिवसेना शाखेत केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी सतीश सावंत यांना केक भरवुन व शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन आ. वैभव नाईक यांनी त्यांचा सत्कार केला.यावेळी शिवसैनिकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना महिला आघाडी प्रमुख सौ निलम पालव , तालुकाप्रमुख शैलेश भोगले , उपतालुकाप्रमुख भालचंद्र दळवी ,कन्हैया पारकर, युवासेना समन्वयक राजू राठोड, शहर प्रमुख प्रमोद मसुरकर, हरकुळ सरपंच बंडू ठाकूर, संतोष परब,सौ माधवी दळवी ,सौ संजना कोलते सौ दिव्या साळगावकर, विलास गुडेकर ,महेश कोदे ,निसार शेख, सचिन आचरेकर ,रुपेश आमडोसकर,नितीन राऊळ, कृष्णा एकावडे ,संतोष सावंत, राजू ढवण ,सौ रश्मी बाणे, सौ धनश्री मेस्त्री, रवी गावडे ,जगन्नाथ आजगावकर ,समीर परब , महेश राणे, चेतन पाटील, आनंद आचरेकर, शामा परब ,महेंद्र डिचोलकर ,सीआर चव्हाण तेजस राणे ,रोहित राणे ,शरद सरंगले ,संजय डगरे ,लक्ष्मण लोके,अरुण परब,सिद्धेश राणे,व्यंकटेश वारंग, शिरीष घाडीगावकर, प्रवीण सावंत, चैतन्य सावंत यांसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.