*कोंकण Express*
*केईएम हॉस्पिटल व टाटा हॉस्पिटल येथे दाखल होणाऱ्या मुंबई बाहेरील रूग्ण व नातेवाईकांना राहण्यासाठी होणाऱ्या गैरसोईबाबत माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले होते लाक्षणिक उपोषण*
*केईएम हॉस्पिटल, वाडीया हॉस्पिटल आणि टाटा कॅन्सर रुग्णालय येथे हेल्थ कॉरीडोअर सुरू करण्याकरिता माजी आमदार प्रमोद जठार यांनी डॉ. हरीश पाठक, डॉ. संगीता रावत यांची भेट घेऊन उपोषण घेतले मागे*
*मुंबई*
परेल परिसरात रा.ए. स्मा. रुग्णालय (केईएम), बाडीया हॉस्पिटल (मुलांचे व प्रसुतीचे) आणि टाटा कॅन्सर रुग्णालय असुन येथे हेल्थ कॉरीडोअर (Health Comdor) जाहीर करण्यात यावे याबाबत सभा आयोजित करण्यात आली व सदर सभेत खालील मुद्दे उपस्थित करण्यात आले.
रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्ण ज्या रुग्णालयात दाखल झालेला आहे, तेथेच जवळपास राहण्याची व्यवस्था करण्यात यावी.
२ हेल्थ कॉरीडोअर (Health Corridor) च्या माध्यमातून जेवढया इमारतींचा पुनर्विकास करण्यात येईल, त्या इमारतीमध्ये रुग्णालयाला जागा देण्यात येईल, तेव्हा त्या विकासकाला
(Contractor) जास्त एफएसआय मंजूर करण्यात यावा. रा.ए.स्मा. रुग्णालय (केईएम) व वैद्यकीय महाविद्यालय परिसरात पुरातन वास्तू (हेरिटेज इमारती) आहेत. तरीही येथे सेंटनरी टॉवर-१ व २, कर्मचारी भवन इत्यादीचे काम प्रस्तावित आहे.
आर. एम. भट शाळे सेजारी एक पड़की इमारत आहे, ती पूर्वी केईएम रुग्णालयाच्या ताब्यात होती. पण आता शिक्षण विभागाच्या ताब्यात आहे. तरी सदर जागा केईएम रुग्णालयाच्या ताब्यात मिळाली तर तेथे नातेवाईकांच्या राहण्याची सोय करण्याकरीता नवीन इमारत बांधण्याचे प्रस्तावित करता येईल. साईबाबा पथ, म्युनिसिपल शाळा, बीईएसटी कॉलनी शेजारी, परेल येथील मोठा परिसर उपलब्ध आहे.