*कोंकण Express*
*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिर संपन्न*
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी, बालमंदिर कनेडी प्रशालेत वार मंगळवार दिनांक- २३/०१/२०२४ रोजी प्रशालेत कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई आणि भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने “कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिर” वर्गाचे आयोजन करण्यात आले.
कनेडी प्रशालेत वर्षभर अनेक नवउपक्रम कार्यक्रमांची रेलचेल असते त्यापैकी “कमवा व शिका” आणि स्वयंरोजगार योजने अंतर्गत विद्यार्थ्यी व पालकांसाठी कुक्कुटपालन प्रशिक्षण देण्यात आले.
कुक्कुटपालन हा शेती पुरक पारंपारिक व्यवसाय आहे, आधुनिक युगामध्ये भविष्यात स्वयंरोजगार व उत्पन्न मिळवून देणारा महत्वाचा व्यवसाय ठरणार आहे
सदर कार्यक्रमासाठी कार्यक्रमाध्यक्ष सन्मा.श्री. सतीशजी सावंत ( अध्यक्ष,क.ग.शि.प्र.मंडळ, मुंबई) सन्मा.श्री.आर.एच.सावंत, (शालेय समिती चेअरमन), सन्मा.श्री. तुषार सावंत (शालेय समिती सदस्य), प्रमुख उपस्थिती मा.श्री. नवीन मालवणकर ( विषय- कुक्कुट पालनातील आधुनिक तंत्र व पद्धती), मार्गदर्शक मा.श्री. मधुसूदन कांदे ( विषय- कुक्कुटपालन पक्षांचे संगोपन व व्यवस्थापन), प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मा.श्री. सुमंत दळवी,पर्यवेक्षक मा.श्री. बयाजी बुराण, तसेच प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, प्रशिक्षणार्थ्यी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.