*कोकण Express*
*आरोंदा गावळेवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जिवदान*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
आरोंदा गावळेवाडी येथे विहिरीत बिबट्या पडला आहे. विहीर मालक डोमा हे आज सकाळी विहीरीपाशी गेले असता त्यांना हा बिबट्या विहिरीत पडलेला दिसून आला. यानंतर त्यांनी तत्काळ वनविभागला याबाबत माहिती दिल्यानंतर वन अधिकारी व वनकर्मचारी बिबट्याला पकडण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. अखेर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पिंजऱ्याच्या सहाय्याने बिबट्याला वन अधिकाऱ्यांनी जेरबंद करत सुरक्षितणे नैसर्गिक अधिवासात सोडले. यावेळी सावंतवाडी वनक्षेत्रपाल गजानन पानपट्टे, वनपाल चंद्रसेन धुरी, आप्पासो राठोड, रमेश पाटील, चंद्रकांत पडते, वनसेवक बबन रेडकर, जंगले आदी उपस्थित होते.