गोमूत्र शिंपडून दारिस्ते मुख्य रस्त्याचे शिवसेना ठाकरे गटाकडून भूमिपूजन

गोमूत्र शिंपडून दारिस्ते मुख्य रस्त्याचे शिवसेना ठाकरे गटाकडून भूमिपूजन

*कोंकण Express*

*गोमूत्र शिंपडून दारिस्ते मुख्य रस्त्याचे शिवसेना ठाकरे गटाकडून भूमिपूजन*

*लोकांना खोटी माहिती देत भूमीपूजनासाठी गोळा केल्याचा लोके यांचा आरोप*

मागील दहा वर्ष रखडलेला दारिस्ते मुख्य रस्ता शिवसेना नेते स्थानिक खासदार यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला होता. या रस्त्याच्या कामाकरिता युवासेना तालुकाप्रमुख म्हणून मी पाठपुरावा केला होता. त्याला यश आल्याने लपून छपून नाही तर जाहीर रित्या या रस्त्याचे भूमिपूजन आम्ही केल्याची माहिती युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी दिली. या रस्त्याचे काम मंजूर होऊन ते पूर्ण होईपर्यंत त्याकरिता सातत्याने पाठपुरावा करून आंदोलनही करण्यात आले. त्यानंतर आज या कामाचे भूमिपूजन करून काम सुरू करण्यात आले असेही लोके यांनी सांगितले. स्थानिक आमदार किती खोटं बोलतात हे दारिस्ते गावातील लोकांना माहिती असून, गावामध्ये गेली कित्येक वर्षे खोटी आश्वासन देऊन गेले होते. याचे त्यांनी चिंतन करावे असा टोला त्यांनी लगावला. आज खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या पाठपुराव्याने रस्ता मंजूर आणि काम चालू झाले. पण काहींनी लोकांना महाआरती आहे, हळदी कुंकू आहे, झेंडे लावायचे आहेत अस खोटं बोलून गुपचूप भूमिपूजन केल्याचा आरोप लोके यांनी केला. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज खोट बोलून व सूर्य मावळतीच्या वेळी काळोख पडताना केलेल्या भूमिपूजनाच्या जागेवर गोमूत्र शिंपडत भूमिपूजन करून काम सुरू करण्यात आले अशी माहिती लोके यांनी दिली. ग्रामस्थानी खासदार विनायक राऊत आणि उत्तम लोके यांचे आभार मानले. जे काम मागील 10-15 वर्षे होत नव्हते ते काम उत्तम लोके यांच्या चिकाटीमुळे पूर्णत्वास नेले असे उद्गार ग्रामस्थांनी काढले. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर जाधव, स्नेहल देवळी, सुभाष देवळी, माजी सरपंच केशव मेस्त्री, लक्ष्मण तेली, लवू पवार, शाखा प्रमुख अविनाश गावकर, युवासेना शाखा प्रमुख विजय गावकर, संदीप गावकर, विजय गावकर, श्रीराम गुरव, रवींद्र गुरव, रोशन गुरव, दीपक मेस्त्री, रोहित ठाकूर, प्रणय ठाकूर, शतृगण ठाकूर, दीपक पवार, गणेश पवार, परशूराम पवार, अंकिता गावकर, ऋषाली सावंत, समृध्दी गावकर, विजया गावकर, प्रतीक्षा गावकर, नमिता मेस्त्री, प्रतीक्षा मेस्त्री, अंगुली पवार, जितेंद्र गावकर, गणेश गावकर, सौरभ गावाकर, बाळा शिरसाठ, शिवा गावकर, गणराज गुरव, सूरज देवळी व आदी कार्यकर्ते आणि ग्रांमस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!