*कोंकण Express*
*पावशी ग्रामस्थांच्या वतीने श्री देवी सातेरी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम…*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
काल अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानिमित्ताने पावशी ग्रामस्थांच्या
वतीने श्री देवी सातेरी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या निमित्ताने पावशी गावातील सर्व प्रामस्थ एक दिलाने एकत्र येऊन हा सोहळा’ ना भूतो न भविष्यती’ असा पार पडला, माजी सरपंच पप्या तवटे मित्र मंडळ व चंद्रकांत वाटवे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते सदर धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी खासदार निलेश राणे यांनी श्री देवी सातेरी मंदिरात पुजन करण्यात आलेल्या प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. तसेच महाप्रसादाचाही लाभ घेतला त्यापूर्वी निलेश राणे यांचा पावशी ग्रामस्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यापूर्वी सकाळी 9 वाजता प्रभु श्रीरामच्या मूर्तिचे भव्य दिव्य ढोल ताशांच्या गजरात मोठी मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमास पावशी सरपंच वैशाली पावसकर, माजी जी प अध्यक्ष दिपलक्ष्मी पडते, पावशी ग्रापं सदस्य नयना तवटे, अर्पिता शेलटे, निशा पावसकर, संजय कोरगावकर, बाळा केसरकर, हर्षु तेली, सचिन केरकर, तेजस्वी पावसकर, प्रकाश पावसकर, मानसी पावसकर, स्वरा बाळके हे उपस्थित होते. पूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ऋणाल कुंभार, प्रकाश पावसकर, राजन जाधव, शुभम पावसकर, गोट्या शिरोडकर, रमेश कुंभार, योगेंद्र तवटे, बाबा तेली, उदय तवटे, सिद्देश पावसकर, सौरभ तवटे, उदय तवटे, साईल वारडकर, जया वारडकर, बाबू घाडी, दिगंबर केरकर, सुधनवा पावसकर, महेश मावसकर यांनी विशेष मेहनत घेतली.