*कोंकण Express*
*दोन धर्मात तेढ निर्माण करणारी वादग्रस्त पोस्ट शेअर,सावंतवाडी तील घटना*
*हिंदू धर्मीयांची पोलीस ठाण्यात धडक,तात्काळ गुन्हा दाखल करा संजू परब यांची मागणी..*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट इन्स्टाग्रामवर व्हायरल करणार्या सावंतवाडीतील युवकाच्या विरोधात आज सावंतवाडीतील हिंदू धर्मीयांनी आक्रमक भूमिका घेत संबंधितासह त्याला प्रोत्साहित करणार्या अन्य युवतींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सावंतवाडी पोलिस निरिक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्याकडे केली. दरम्यान याबाबत तात्काळ गुन्हा दाखल न झाल्यास १० हजार हिंदू धर्मीयांना घेवून सावंतवाडी पोलिस ठाण्यात मोर्चा काढू, असा इशारा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला. अयोध्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीतील एका महाविद्यालयीन युवकाने जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट इस्ट्राग्राम अकाउंटवर व्हायरल केली. त्यानंतर त्या पोस्टला काही त्यांच्या सहकार्यांनी लाईक व शेअर केले. त्यामुळे हा प्रकार अनेकांच्या लक्षात आला. यावेळी त्यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. यावेळी झालेला प्रकार हा चुकीचा आहे. संबंधित युवकाने यापुर्वी ३ वेळा अशाच प्रकारची पोस्ट व्हायरल केली होती. त्यामुळे त्याच्यासह त्याला प्रोत्साहित करणार्या त्यांच्या मैत्रीणीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी माजी नगराध्यक्ष परब यांनी निरिक्षक अधिकारी यांची भेट घेतली. यावेळी झालेला प्रकार अत्यंत चुकीचा आहे. त्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा आम्ही १० हजाराचा मोर्चा आणू, असा इशारा त्यांनी दिला. त्यानुसार आम्ही उशिरा संबंधित युवक आणि युवतीवर गुन्हा दाखल करू, अशी भूमिका श्री. अधिकारी यांनी घेतली. यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, सुधीर आडिवरेकर, अजय सावंत, किशोर चिटणीस, सुनील सावंत, गौरव शंकरदास, कृष्णा धूळपणवार, सुधा राणे, शिवम सावंत, प्रतिक बांदेकर, संदिप धुरी, हीतेन नाईक, अजित सांगेलकर, साई जामदार, राजू कासकर, केतन आजगावकर, सिताराम गावडे, प्रदीप सावंत, निखिल गावड, मंथन सावंत, सद्गुरु पाटील, संकल्प धारगळकर, कृष्णा राजे, स्वप्निल कमते, संदेश टेमकर आदी उपस्थित होते.