*कोंकण Express*
*ह्यूमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्गच्या वतीने सा. बां विभाग कार्यकारी अभियंता अजयकुमार सार्वगौड यांना पोलिस वसाहतींबाबत दिले विशेष*
*अजयकुमार एम्. सर्वगोड कार्यकारी अभियंता*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ह्यूमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने
नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सार्वगौड यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिस वसाहतींबाबत विशेष निवेदन देण्यात आले. सर्व पोलीस कर्मचारी वर्गाच्या पोलीस वसाहतींची आवश्यकतेनुसार दुरुस्ती अथवा पुनर्वांधणी करून मिळावी म्हणजे कर्मचारी वर्गाला पुरेशा सुविधा उपलब्ध झाल्या तर कर्मचारी वर्गाचे मनोबल वाढून ते जास्त वेळ व त्वरीत सेवा देऊ शकतील असे या निवेदनात नमूद केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील कणकवली सारख्या संवेदनशील शहरांत कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होऊन अशांततेची परिस्थिती उद्भवली तर तात्काळ पोलीस दल अथवा इतर कोणतीही सुरक्षा व्यवस्था करणे अवघड होते. कारण शहरातील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीसांसाठी पोलीस ठाण्यानजिकच असलेल्या वसाहती झालेल्या असल्याने सर्व कर्मचार्यांना आपली निवासाची व्यवस्था इतरत्र करावी लागते. पर्यायाने पोलीस ठाण्यापासून लांब राहावे लागते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ फायदा व सुव्यवस्था राखणे फार अवघड होते. तरी कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्यातील सर्वच पोलीस वसाहती पुनर्बाधणी करून कर्मचारी वर्गाला सर्व सोयी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था तात्काळ करावी अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी ह्यूमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शनने ऐकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, कणकवली तालुका कार्याध्यक्ष हनीफ़भाई पिरखान, डॉ. हा टेल और तळवडेकर उपस्थित होते.