आशिये गावातील मोटारसायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

आशिये गावातील मोटारसायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

*कोंकण Express*

*आशिये गावातील मोटारसायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद*

 *प्रभू श्री राम मूर्ती प्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्त आयोजन*

प्रभू श्री राम यांच्या मूर्ती प्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्त आशिये गावातील युवा वर्गाच्या वतीने आशिये गावात आज मोटारसायकल रॅली काढण्यात आली. श्री. दत्तमंदिर येथून या रॅलीला सुरुवात झाली. तेथून बाणेवाडी मार्गे श्री गांगोभैरी मंदिरात दर्शन घेऊन खालचीवाडी, टेंबवाडी, बाणेवाडी ते वरचीवाडी नंतर ठाकूरवाडी ते ओमनगर येथून पुन्हा श्री.दत्तमंदिर पर्यंत ही रॅली काढण्यात आली. या रॅलीत आशिये गावातील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जय श्री राम, प्रभू श्री रामचंद्र की जय! अयोध्या पति श्री रामचंद्र की जय अशा घोषणा देत जल्लोष साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!