*कोंकण Express*
*माऊली मित्र मंडळ, व्यापारी मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम*
*आज दिनांक २२/०१/२०२४ रोजी ,माऊली मित्र मंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर, आधारस्तंभ अशोक काका करंबेळकर यांचे संकल्पनेतून नानाविध उपक्रम राबविले जातात,
*आज अयोध्या नगरी श्री राम प्रभूंची प्राण प्रतिष्ठापने चे औचित्य साधून अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे प्रभाकर कदम, रविकांत जाधव, सी आर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री राम प्रभूंच्या चरणी पुष्पहार, पुष्पांजली अर्पण करून, दीपोत्सवा करिता ५ लिटर तेल मंडळाचे स्वाधीन केले,
*छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हि पुष्पहार पुष्पांजली अर्पण करून, ५लिटर तेल दीपोत्सव करिता अर्पण करण्यात आले, यावेळी मिलिंद मेस्त्री सहित सर्व कार्यकर्ते उपस्थितीत होते,
* यावेळी सुभाष उबाळे, अविनाश गावडे ,बाबुराव घाडिगावकर ,विशाल रजपूत, हेमंत नाडकर्णी, प्रसाद उगवेकर, प्रसाद पाताडे ,भगवान कासले लक्ष्मण महाडीक ,सईद नाईक, ज्ञानदेव मोडक, सचिन कुवळेकर, आदि उपस्थितीत होते,
*संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या सर्व मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थितीत होते,

