*कोंकण Express*
*फोंडाघाट नवीन कुर्ली येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन*
अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नवीन कुर्ली या ठिकाणी नवदुर्गा युवा मंडळ ,नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळ तसेच नवीन कुर्लीतील ग्रामस्थांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या मध्ये दुपारी श्रीराम प्रतिमेचे पूजन, आरती त्यानंतर महाप्रसाद, महिलांसाठी हळदीकुंकू, सायंकाळी दीपोत्सव तसेच रात्री स्थानिक भजनांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी संपूर्ण परिसर राममय झाला होता आणि जय श्री राम च्या घोषणांनी दणाणून गेला होता.
दुपारी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते, उपाध्यक्ष सुरज तावडे, सचिव धीरज हुंबे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमित दळवी, कृष्णा परब, कृष्णा पवार, मधुकर परब ,अनंत चव्हाण, शिवराम पवार, शांताराम पार्टे, जनार्धन पवार ,महेश चव्हाण, विजय राणे, लक्ष्मण चव्हाण, महादेव येंडे , सुरेंद्र पवार, अनंत दळवी, नवदुर्गा युवा मंडळाचे पदाधिकारी अरुण पिळणकर, मंगेश मडवी,अतुल डऊर ,प्रदीप आग्रे, विजय आग्रे,सचिन साळसकर आदी ग्रामस्थ रामभक्त तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.