*कोंकण Express*
*प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त फोंडाघाट मधील श्री देव केळोबा मंदिर याठिकाणी सोमवार दि. २२ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
यामध्ये सकाळी मंदिरात आरती त्याचबरोबर महिलांचे फुगडी व लहान मुलांसाठी कार्यक्रम सायंकाळी ४.३० वाजता त्यानंतर सायंकाळी ठीक ६.३० ला आरती व दिपोत्सव त्यानंतर व रात्रौ ९.३० वाजता स्थानिक भजन असे कार्क्रम होणार आहेत.
प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त संपूर्ण देशात विविध ठिकाणी, गावात – गावात उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करून या सोहळ्याचा आनंद उत्सव सर्व ठिकाणी साजरा होत आहेत त्यामुळे आपल्या स्थानिक रहिवाशी लोकांसोबत हा सोहळा साजरा व्हावा या हेतूने श्री देव केळोबा मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे यावेळी श्री देव केळोबा मंडळ अध्यक्ष श्री. दिपक इस्वलकर यांनी सांगितले.