*कोंकण Express*
*गुरुश्री अबॅकस च्या राज्यस्तरीय परीक्षेत सौ. इं. द. वर्दम हायस्कूल पोईप विरण व केंद्र शाळा पोईप नं १ च्या विद्यार्थ्यांची कौतुकास्पद कामगिरी*
गुरुश्री अबॅकस ची राज्यस्तरीय परीक्षा १४/०१/२०२४ रोजी कोल्हापूर येथे पार पडली. स्पर्धेमध्ये ३०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते .यामध्ये पोईपचे एकूण बारा विद्यार्थी प्रविष्ट झाले होते .प्रथम कु. ऋचा केदार सावंत,द्वितीय कु. हार्दिका राजाराम पाटकर, तृतीय कु. आरुष प्रसाद चव्हाण,कु. स्वरा प्रमोद पाटील, पाचवा कु. अथर्व विठोबा माधव,कु.देवयानी गोपाळ पाचंगे .या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन . सर्व विद्यार्थ्यांना गुरुश्री अबॅकस चे संस्थापक श्री. अविनाश भिसे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .
याबद्दल पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. अनिल कांदळकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक श्री. कुंभार सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,केंद्र शाळा पोईपचे मुख्याध्यापक श्री घाडीगांवकर सर, श्री. पाटील सर, पंचक्रोशीतील ग्रामस्थ व पालक यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

