*”फोंडाघाट येथील जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत कासार्डेच ‘चॅम्पियन्स’ :१४ गोल्ड मेडलसह ३९ पदकांची कमाई “*

*”फोंडाघाट येथील जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत कासार्डेच ‘चॅम्पियन्स’ :१४ गोल्ड मेडलसह ३९ पदकांची कमाई “*

*कोंकण Express*

*”फोंडाघाट येथील जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत कासार्डेच ‘चॅम्पियन्स’
:१४ गोल्ड मेडलसह ३९ पदकांची कमाई “*

*कासार्डे प्रतिनिधी: संजय भोसले*

सिंधुदुर्ग जिल्हा आझाद ज्युदो असोसिएशनच्या वतीने फोंडाघाट ता.कणकवली या संस्थेच्या ३१ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या खुल्या जिल्हास्तरीय ज्यूदो स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो असोसिएशनच्या ३९ खेळाडूंनी विविध वयोगट व वजन गटातून अभिनंदनीय यश संपादन केले असून या स्पर्धेचे ‘सर्वसाधारण विजेतेपदही कासार्डेतील ज्युदोपट्टूनी पटकाविले आहे.
यशस्वी खेळाडू पुढीलप्रमाणे-
१० वर्षाखालील मुलांच्या गटात-
कु.शर्वील दत्तात्रय मारकड – सुवर्णपदक, कु.देवांश अभिजित शेट्ये- कांस्यपदक
१२वर्षाखालील मुलांच्या गटात-
ध्रुव अभिजीत शेट्ये- रौप्यपदक,मंथन गणेश ओटवकर-कांस्यपदक,
आदर्श दीपक जाधव-
सुवर्णपदक,सार्थक राजकुमार वांगणकर- कांस्यपदक,आराध्य मधुसूदन राणे- रौप्यपदक, भावेश शिवानंद नारकर- सुवर्णपदक
१४ वर्षाखालील मुलांच्या गटात-
अमोल दीपक जाधव -सुवर्णपदक ,शुभम सुरेश राठोड- सुवर्णपदक , आर्यन नारायण राणम- कांस्यपदक, सोहम सत्यवान पाटील- सुवर्णपदक , रुक्षराज रामदास घुगे-रौप्यपदक, आदर्श मोहन राठोड- कांस्यपदक ,
*१७ वर्षाखालील मुलांच्या गटात -*
दुर्वास संजय पवार- सुवर्णपदक, दुर्वेश संदीप गोसावी- रौप्यपदक,सार्थक गणेश गुरव- कांस्यपदक, विश्वास चंदू चव्हाण- रौप्यपदक, किशोर बाबूलाल देवासी- कांस्यपदक
मुलींच्या विविध वजनी गटातील स्पर्धेत-
१२वर्षाखालील मुलींच्या गटात-
कु.अहिल्या मधुसूदन राणे-रौप्यपदक,कु.धैर्या अरविंद परब- रौप्यपदक, कु.ऋतुजा धनाजी शिंदे -सुवर्णपदक,
१४ वर्षाखालील मुलींच्या गटातून:-
कु.सना रहमान शेख- सुवर्णपदक,कु.रिद्धी प्रशांत राणे- रौप्यपदक,कु.दुर्वा प्रकाश पाटील- सुवर्णपदक, कु.शिवानी महादेव जाधव- कांस्यपदक ,कु.भक्ती महेश लाड- सुवर्णपदक, कु.लावण्या नारायण झोरे- रौप्यपदक,कु.सृष्टी दिपक राणे- कांस्यपदक, कु.विधी संजय चव्हाण- सुवर्णपदक, कु.मृणाल संदीप सावंत- रौप्यपदक,
*१७ वर्षाखालील मुलींच्या गटातून-*
कु.समीक्षा प्रदीप येंडे – रौप्यपदक, कु.सावनी प्रशांत शेटे- कांस्यपदक,
कु.वैदेही मधुसूदन राणे- रौप्यपदक, कु.भार्गवी संजय खानविलकर – कांस्यपदक,
कु.रिद्धी अरविंद परब – कांस्यपदक, कु.साक्षी संतोष तेली- सुवर्णपदक, कु.नंदिता प्रवीण मत्तलवार- रौप्यपदक,
कु‌.असावरी हर्षकांत तानवडे- सुवर्णपदक ,
सर्व पदक विजेत्या खेळाडूंना फोंडाघाट येथील कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्हा आझाद ज्युदो असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते मेडल,प्रमाणपत्र आणि
सर्वसाधारण विजेत्या पदाचा आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
“३९पदकासह जनरल चॅम्पियन्सशिप ट्रॉफीवरही कासार्डेचे नाव”
या स्पर्धेत कासार्डे येथील सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो असोसिएशनच्या ज्युदो क्लबमधील ४८ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.यापैकी तब्बल ३९ खेळाडूंनी विविध वजनी गटात यश संपादन करीत एकुण १४ गोल्ड मेडल,१३ सिल्व्हर मेडल व १२ ब्राॉन्झ मेडल मिळून ३९ मेडल्स आणि जनरल चॅम्पियन्सशिप ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे.
या यशस्वी खेळाडू मधील ३७ खेळाडू हे कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी आहेत.
या सर्व यशस्वी खेळाडूंना सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो असोसिएशनचे सचिव दत्तात्रय मारकड,प्रशिक्षक अभिजित शेट्ये,सोनु जाधव,सौ.शिल्पा शेट्ये व
इतर प्रशिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.
या यशस्वी खेळाडूंचे सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो असोसिएशनचे अध्यक्ष डॉ मिलिंद कुलकर्णी,सचिव दत्तात्रय मारकड,उपाध्यक्ष निळकंठ शेट्ये,खजिनदार अभिजित शेट्ये, सदस्य राकेश मुणगेकर,सिध्देश माईणकर,सचिन चव्हाण यांच्यासह इतर पदाधिकारी सदस्य तसेच कासार्डे माध्यमिक विद्यालय आणि संस्थेचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!