*कोकण Express*
*सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न*
*सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी तसेच कोरोनाच्या काळात अतिशय चांगले कार्य केलेल्यांचा सन्मान*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सरपंच सेवा संघ,महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने दिला जाणारा यंदाचा मान कर्तृत्वाचा, सन्मान नेतृत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष तथा निगुडे उपसरपंच श्री गुरुदास गवंडे यांना सिंधुदुर्ग जिल्हा भूषण सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त झाला*. सदर वितरण सोहळा २२ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ०१ वाजता हाँटेल जे. के. पॅलेस साई गोल्ड, शिर्डी परीसरात शानदार सोहळा संपन्न झाला संस्थापक बाबासाहेब पावसे पाटील संगमनेर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष यादवराव पावसे होते. सरपंच हा ग्रामविकासाचा घटक आहे यांनी असे कार्यरत करावे कि ते काम अस्मणिय राहील असे आवाहन समाजप्रबोधन निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी केले. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे, ग्रामसेवक युनियन चे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे ,भाऊ मरगळे, विक्रम भोर, हरीप्रिया शुगर चे अध्यक्ष जयदिप वानखेडे, कार्यकारी संचालक अंनत ऊर्फ बाळासाहेब निकम, स्वागतध्यक्ष सरपंच प्रदीप हासे, सरपंच रविंद्र पवार यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्रात सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्र भर कार्यरत राहुन सरपंच यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्यावर सरकार सोबत सातत्याने पाठपुरावा करून महाराष्ट्र एक आगळावेगळे उपक्रम राबवून सरपंच यांना एक आधार म्हणून सरपंच सेवा संघ कार्य करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संपुर्ण महाराष्ट्रात आदर्श गावे निर्माण करण्यासाठी एक मोठा आराखडा तयार करून महाराष्ट्रात काही गावे निवडुन ग्रामविकासाचे काम गावोगावी जाऊन सुरू करणार आहे.विविध क्षेत्रातील पुरस्कार मानकरी कार्यकर्त्या चे भरीव योगदान कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले याबद्दल यंदाचे राज्यस्तरीय पुरस्कार. आदर्श सरपंच,उघोग भुषण,पत्रकारीता, युवारत्न, प्रशासकीय सेवा, भूषण सामाजिक, शैक्षणिक,कोरोनायोध्दा,मिडीया ,कृषी ,व्यापार, कला,राजकीय, महसुल , वैद्यकीय, अध्यात्मिक, ऐतिहासिक,दिंव्याग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सुत्रसंचालन प्रा.सोनाली म्हरसाळे ,इंजि युवराज सातपुते यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सरपंच सेवा संघाचे समर्थक युवा सामाजिक कार्यकर्ते शरदराव देवकाते यांनी केले.