वाहनाची ठोकर मारून पादचाऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संतोष बिर्जे याची निर्दोष मुक्तता

वाहनाची ठोकर मारून पादचाऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संतोष बिर्जे याची निर्दोष मुक्तता

*कोंकण Express*

*वाहनाची ठोकर मारून पादचाऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संतोष बिर्जे याची निर्दोष मुक्तता*

*कणकवली ः प्रतिनिधी*

दिनांक १८/०४/२०१९ रोजी कणकवली हद्दीतील मुंबई-गोवा हायवेवर उबाळे मेडिकल समोर आपल्या ताब्यातील चारचाकी वाहनाने वाहन बेदारकपणे, निष्काळजीपणे, अविचाराने चालवत रस्त्याचे कडेवरून पायी चालत जाणारे निर्भय लक्ष्मण मयेकर यांना पाठीमागून जोरदार ठोकर मारून जखमी करून त्यांचे मृत्यूस कारणीभूत ठरले प्रकरणी संतोष बाबू बिर्जे, राहा. मु.पो. बुधवळे, ता-यांनी दिनांक १७/०१/२०२४ रोजी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अँड प्राजक्ता म.शिंदे यांनी काम पाहिले.
याबाबतची सविस्तर हकीकत अशी की,
दिनांक १८/०४/२०१९ रोजी संतोष बाबू बिर्जे हे कणकवली हद्दीतील मुंबई-गोवा हायवेवर उबाळे मेडिकल समोर आपल्या ताब्यातील चारचाकी वाहन मारुती इको नं. एम.एच.०७.सी.८१९८ हे गोवा बाजूकडून मुंबई बाजुकडे चालवत घेवून जात असताना संतोष बाबू बिर्जे यांनी वाहन चालत असलेल्या रस्त्याचे परिस्थितीकडे व वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून आपल्या ताब्यातील वाहन बेदरकारपणे, निष्काळजीपणे, अविचाराने चालवत रस्त्याचे कडेवरून पायी चालत जाणारे निर्भय लक्ष्मण मयेकर यांना पाठीमागून जोरदार ठोकर मारून जखमी करून त्यांचे मृत्यूस कारणीभूत ठरले प्रकरणी संतोष बाबू बिर्जे, राहा. मु.पो. बुधवळे, ता-मालवण याचे विरुद्ध कणकवली पोलीस स्टेशन भा.द .वि कलम ३०४(अ), २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा रजिस्टर नं. ८४/२०१९ येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. व तपासाअंती आरोपीविरुद्ध दोषारोप कणकवली न्यायालयात पाठविण्यात आले होते. सदर केसची सुनावणी मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कणकवली यांचे समोर पूर्ण झाली. पुराव्याअंती आरोपी संतोष बाबू बिर्जे याची याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपीच्या वतीने अँड.प्राजक्ता शिंदे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!