*कोंकण Express*
*माऊली मित्र मंडळ, शालेय मित्र मंडळांने केले पवित्र विद्या दान*
*आज दिनांक १७/०१/२०२४ रोजी माऊली मित्र मंडळ, राजेंद्र मनोहर पेडणेकर शालेय मित्र मंडळ , तसेच जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ, राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्र मंडळ, ॐ नमो भगवते भालचंद्राय या सर्व मित्र मंडळाच्या वतीने “सदगुरू भालचंद्र महाराज विद्यालय शाळा नंबर ३ ला भेट देण्यात आली,
* संजय मालंडकर, विवेक मुंज, प्रशांत प्रभुलकर यांच्या हस्ते शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. वर्षा वामन करंबेळकर यांनी अनमोल अशा ग्रंथरुपी खजिन्याचा स्विकार केला,
*यावेळी पेडणेकर शालेय मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय मालंडकर, विवेक मुंज, पेडणेकर मित्र मंडळाचे अध्यक्ष अविनाश गावडे, व्यापारी मित्र मंडळाचे उपाध्यक्ष हेमंत नाडकर्णी, ॐ नमो भगवते भालचंद्राय या मित्र मंडळाचे अध्यक्ष रविकांत जाधव उपस्थितीत होते,
*सचिन कुवळेकर, भगवान कासले ,प्रसाद पाताडे ,बाबुराव घाडिगावकर , प्रभाकर कदम, विशाल रजपूत, महेश मेस्त्री, महेश वांयगणकर,सईद नाईक, जमिल कुरैशी,सौ भारती फाटक, सौ धुरी, सौ वैशाली सुर्यवंशी, प्रसाद उगवेकर , अस्तेक शेख, नुरूभाई, लवु जैताळकर इत्यादी सर्व मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थितीत होते,
*प्रशांत प्रभुलकर यांनी असे म्हटले की, संस्थापक अध्यक्ष पेडणेकर यांच्या २० जानेवारी २०२४ रोजी संपन्न होणाऱ्या ६० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून, त्यांच्या शालेय मित्र मंडळाचे वतीने हि अनमोल अशी ग्रंथरुपी भेट देत आहोत, या ग्रंथातून मुलांनी वाचन कला अवगत करून, शिव छत्रपती शिवाजी महाराज, भारत देशाचे माजी राष्ट्रपती, महान व्यक्तीमत्व अब्दुल जी कलाम यांचे आत्मचरित्र, चान्यक निती, या सारख्या अनेक पुस्तकांचा ठेवा, आम्ही तुमच्या करिता दिला आहे, याचे वाचन, मनन करून समाजातील इतरांना हि सज्ञान करा,
*शालेय मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय मालंडकर यांनी असे म्हटले की, राजु पेडणेकर, विवेक मुंज, साधना आळवे, आणि इतर सर्व आम्ही याच बाबांच्या शाळेत शिक्षण घेतले, आणि आम्ही आज सर्व वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत राहून कणकवली च नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे,
*संस्थापक अध्यक्ष पेडणेकर यांनी असे प्रतिपादन केले की, आम्ही सर्व च मित्र मंडळींनी हायस्कूल असो वा कॉलेज यांना वेळोवेळी भेटी देऊन, मदत केली आहे, पण ज्या शाळेत पहिली पासून सातवी पर्यंत शिक्षण घेतले, त्या बाबा भालचंद्र विद्यालया ला आज खरी अशा स्वरूपाची मदत करण्याची आवश्यकता आहे, तरी सर्व माजी विद्यार्थी वर्गाने बाबा भालचंद्र विद्यालया ला भेट देऊन सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन ही पेडणेकर यांनी केले,
* शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम करंबेळकर यांनी भारत सरकारचे आभार मानले, आणि राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या सर्व च मित्र मंडळाचे आभार मानले,
*याप्रसंगी श्रीम अक्षया अनंत राणे, प्रतिभा खंडेराव कोतवाल, श्री लक्ष्मण मधुकर पावसकर, निवृत्ती ज्ञानदेव गुरव, संतोष रघुनाथ घाडिगावकर, संजय शांताराम तांबे, श्रीम अश्विनी अनंत साटम, रुपाली रमेश डोईफोडे, स्वाती सुहास कदम आदी सर्व शिक्षक वर्ग उपस्थितीत होते,
*यावेळी सर्व शिक्षक वर्गाने आपली मनोगते व्यक्त केली,व सर्व च मित्र मंडळाचे आभार मानून, असेच माजी विद्यार्थी म्हणून भेट देत रहा असे म्हटले