*कोंकण Express*
*रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन*
*सिंधुदुर्गनगरी, दि.17 (जि.मा.का):*
जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, परिवहन विभाग, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे गुरुवार दि. 18 जानेवारी रोजी, सकाळी 11 वाजता रस्ता सुरक्षा अभियान 2024 कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते होणार आहे.*
निवासी उप जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे, अप्पर पोलीस अधिक्षक कृषीकेश रावले, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अभिजीत पाटील, रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता, लक्ष्मीकांत जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, प्राथमिक, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रदिपकुमार कुडाळकर, कणकवली सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रिजवान नदाफ आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
०००००००