*कोकण Express*
*सावंतवाडी मडुरा- सातोसे- नांगरसडा- सातार्डा- कवठणी -किनळे रस्ता कायमस्वरूपी ठेवणे….*
*२६ जानेवारी रोजी तहसीलदार सावंतवाडी या ठिकाणी उपोषण*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यातील मडुरा सातोसे कवठणी किनळे रस्ता तत्कालीन इजीमा क्र. ३३ व आत्ताचा प्रजिमा मार्ग क्र. ६३ या रस्त्याला लागून रोणापाल , निगुडे , शेर्ले , कास , पाडलोस किनळे कवठाणी सातोसे सातार्डा हे गाव लागून आहेत. हा रस्ता ६० ते ७० वर्षापासून अस्तित्वात आहे. गेली ४० ते ४५ वर्षे या रस्त्यावरून एस्. टी. सेवा व कदंबा सेवा चालू आहे . १९९६ च्या दरम्यान म्हणजेच साधारणत:२५ वर्षापूर्वी उषा ईस्पात या कंपनीने प्रकल्प उभारणीसाठी सातोसे , सातार्डा या गावात शेत जमीन खरेदी केली .शेतकऱ्यांनी आपल्या मुलांना व दशक्रोशीतील ( स्थानिकांना ) लोकांना रोजगार मिळेल म्हणूक आपल्या जमिनी कवडीमोल किमतीने विकल्या . उषा ईस्पात कंपनीने सदर जमिनीचे सपाटीकरण करताना हजारो झाडांची कत्तल केली व अवजड वाहने वापरून या जमिनीतून जाणारया इजीमा क्र. ३३ व आत्ताचा प्रजिमा मार्ग क्र. ६३ या रस्त्याची दुर्दशा केली . २ ते ४ वर्षानंतर ती जमीन उषा ईस्पात या कंपनीकडून श्री उत्तम स्टील अँड पॉवर लिमिटेड या कंपनीने प्रकल्प उभारणीसाठी विकत घेतली व आतापर्यंत २० वर्षात प्रकल्प उभारला नाही व भविष्य काळात सुद्धा हा प्रकल्प होण्याची चिन्हे नाहीत .
दरम्यानच्या काळात श्री उत्तम स्टील अँड पॉवर लिमिटेड या कंपनीने विकत घेतलेल्या जमिनीत ६० ते ७० वर्षापासून अस्तित्वात असल्लेला रस्ता इजीमा क्र. ३३ कायमचा बंद करण्यासाठी व पर्यायी रस्ता करण्यासाठी सातोसे व सातार्डा ग्रामपंचायतीकडे नाहरकत दाखला मागितला व तो दोन्ही ग्रामपंचायतीने लोकांचे हित लक्षात नघेताच तत्काळ विनाविलंब दिला.दिलेला नाहरकत दाखला हा कायदेशी आहे , त्याला ग्रामसभेची मान्यता आहे किंवा नाही तसा ठराव ग्रामसभेत झाला किंवा नाही , सदर ठरावाची नोंद ग्रामपंचायातीच्या दप्तरी आहे किंवा नाही याची खात्री पंचायत समिती सावंतवाडी . जिल्हापरिषद सिंधुदुर्ग याने जरासुद्धा केली नाही व जुना रस्ता इजीमा क्र. ३३ हा श्री उत्तम स्टील अँड पॉवर लिमिटेड या कंपनीला हस्तांतरण करून त्याऐवजी पर्यायी रस्ता काढण्याची शिफारस करणारा ठराव जिल्हापरिषद सिंधुदुर्ग याच्या दिनांक २९/०९/२००८ रोजीच्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव संमत केला व महाराष्ट्र शासनाला सादर केला. महाराष्ट्र शासनाने श्री उत्तम स्टिल अँड पॉवर लि. सातार्डा या कंपनीला काही अटीं व शर्ती घालून रस्ता हस्तांतरण करण्यास व पर्यायी रस्ता करण्यास शासनाने मान्यता दिली.
जुनाच रस्ता कायम राहावा हि आमची मागणी खूप वर्षापूर्वी पासूनची आहे. यासाठी अनेक वर्षापासून जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचाकडे आम्ही पत्रव्यवहार केकेला आहे . यासाठी १५ ऑगस्ट२००८ रोजी उपोषणही करण्यात आले होते . त्यावेळी आम्हाला तुमच्या मागणीचा विचार केला जाईल तुम्हाला विश्वासात घेतले जाईल असे आश्वासनही दिले होते. परंतु आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले .
सदर रस्त्याचे हस्तांतरण श्री उत्तम स्टील अँड पॉवर लिमिटेड या कंपनीला करताना आम्हाला पर्यायाने सदर गावातील व गावालगतच्या ग्रामपंचायतीना विश्वासात घेतले नाही. सदर रस्ता गावातील (दशक्रोशीतील ) लोकाना प्रवासी वाहतुकीस व ये जा करण्यास खूपच कमी अंतराचा सोयीस्कर मार्ग आहे .
आमच्या दशाक्रोशीतील ( मडूरा सातोसे , सातार्डा , रोणापाल , निगुडे ,शेर्ल्रे , कास , पाडलोस, किनळे, कवठणी ) ग्रामस्थांच्या बाबतीत घडले आहे. सदर रस्ता हा उपरोक्त गावातील लोकवस्तीतून जात असल्याने दशक्रोशीतील ग्रामास्थाकरीता हा सोयीस्कर आहे. दशक्रोशीतील नागरिक बाजार-रहाटाकरीता , औषधोपचाराकारीता मोलमजुरी करीता , नोकरी व्यवसायाकरिता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेण्याकरिता बांदा , सावंतवाडी , गोवा राज्यात जावे लागते . किमान वेळेत व किमान खर्चात ये जा करण्यासाठी सदर तिन्ही रस्ते अत्यंत उपयुक्त आहेत. सदर रस्ते बंद करण्यात आल्यास त्याचा दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या जीवनावर अनिष्ट परिणाम होणार असून त्यांचे दैनंदिन जीवन गैरसोयीचे, त्रासाचे व कष्टमय होणारे आहे.
सदर रस्त्यासाठी जो सातोसे ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच यांनी नाहरकत दाखला दिलेला आहे त्यावर सातोसे ग्रामपंचायतीने आक्षेप नोंदवून तो बेकायदेशीर आहे व असलेला रस्ता कायम ठेवावा म्हणून जिल्हा सत्र न्यायालयात खटला दाखल केलेला असून सदर खटल्याचा क्र. MHSI0२ -००००९९ -२०१४ असा आहे.
परंतु मडूरा सातोसे , सातार्डा , रोणापाल , निगुडे , शेर्ले , कास , पाडलोस कवठणी , किनळे या गावांना म्हणजे ग्रामपंचायतीना विश्वासात न घेता मडूरा सातोसे , सातार्डा , कवठणी , किनळे रस्ता तत्कालीन इजीमा क्र. ३३ व आत्ताचा प्रजिमा मार्ग क्र. ६३ या रस्त्याचे हस्तांतरण मा. जिल्हापरिषद सिंधुदुर्गने श्री उत्तम स्टील अँड पॉवर लिमिटेड या कंपनीला केले व करताना आम्हाला पर्यायाने सदर गावातील व गावालगतच्या ग्रामपंचायतीना विश्वासात घेतले नाही.
मडूरा सातोसे , सातार्डा , कवठणी , किनळे तत्कालीन मार्ग इजिमा मार्ग क्र. ३३ व आत्ताचा प्रजिमा मार्ग क्र. ६३ हा रस्ता उप अभियंता (वर्ग -१ ) जिल्हापरिषद बांधकाम विभाग सावंतवाडी यांनी शासन निर्णय क्र./जि.प्र/प्र.१६६ दि. ०७/०२/२०१३ अन्वये देखभाल दुरुस्ती प्रयोजनार्थ प्रजीमा दर्जाचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग (राज्यस्तर) यांचेकडील पत्र क्र. उप. अभि/जिप/११४/२०१३ दि.०२/०४/ २०१३ अन्वये हस्तांतरण करण्यात आले आहे . तर उप अभियंता सार्वजिक बांधकाम सावंतवाडी कळविते कि २.२७४ कि.मी. लांबीचा ( सातोसे ते सातार्डा ) यातून वगळण्यात आला असल्याने त्याची दुरुस्ती व देखभाल आम्ही करू शकत नाही. सदर मार्ग हा वाहतुकीस धोकादायक बनला आहे . त्याची दुरुस्ती व देखभाल कोण करणार ?
उपरोक्त पर्यायी रस्त्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यापूर्वी ,पंचायत समिती सावंतवाडी , जिल्हापरिषद सिंधुदुर्ग, जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र शासन यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी किंवा खातरजमा केलेली नाही. तसेच मडूरा सातोसे , सातार्डा , रोणापाल , निगुडे , शेर्ले , कास , पाडलोस , किनळे, कवठणी गावातील जनमत जाणून घेण्याकरिता कोणत्याही प्रकारची जनसुनावणी सुद्धा घेतलेली नाही . त्यामुळे उपरोक्त पर्यायी रस्त्याचा प्रस्तावास चुकीची व बेकायदेशीर मंजुरी मिळालेली आहे.
जिल्हापरिषद सिंधुदुर्ग याच्या दिनांक २९/०९/२००८ रोजीच्या सर्वसाधारण सभेमध्ये श्री उत्तम स्टिल अँड पॉवर लि. सातार्डा , ता. सावंतवाडी , जि. सिंधुदुर्ग या कंपनीच्या प्रकल्प क्षेत्राच्या सरहद्दीजवळून जाणाऱ्या पर्यायी रस्त्यास मान्यता दर्शविणारा ठराव समंत करण्यात आला तो महाराष्ट्र सरकारची दिशाभूल करणारा आहे तो रद्द करावा व तशी शिफारस महाराष्ट्र शासनाला करावी व महाराष्ट्र शासन . ग्रामविकास व जलसंधारण विभाग , शासन निर्णय क्र.जिपर-२९ (अ ) ०९ /प्र..क्र.३२१ /पंरा -८ दिनांक ०३ नोव्हेंबर २०१० रद्द करावा व मडूरा सातोसे , सातार्डा , कवठणी , किनळे तत्कालीन मार्ग इजिमा मार्ग क्र. ३३ व आत्ताचा प्रजिमा मार्ग क्र. ६३ , ग्रामीण मार्ग (जोड रस्ता) क्र.२८ व नांगरसडा – पेळपवाडी (जोड रस्ता) कायम ठेऊन त्याची लवकरात लवकर डागडुजी करावी हि विनंती.
तरी याची दाखल घेऊन योग्य ती कार्यवाही व्हावी . अन्यथा आम्ही दशक्रोशीतील सर्व सरपंचासहित २६ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ०९ वाजल्यापासून मा. तहसीलदार सावंतवाडी यांचे कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहोत असे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदन सादर केले आहे .
जगन्नाथ पांडुरंग पंडित .
आणि समस्थ ग्रामस्थ मडुरा दशक्रोशी
अधिक माहितीसाठी संपर्क्रं.९४०३२७३७४१,७९७२५३९१४५