निलेश राणे लोकसभेचे उमेदवार अश्या वावड्या उठवून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न कोणीही करू नये

निलेश राणे लोकसभेचे उमेदवार अश्या वावड्या उठवून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न कोणीही करू नये

*कोकण Express*

*निलेश राणे लोकसभेचे उमेदवार अश्या वावड्या उठवून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न कोणीही करू नये*

*निलेश राणे मालवण कुडाळ विधानसभेचे उमेदवार निश्चित*

*लोकसभा उमेदवारी बाबत त्यांचे नावं जोडणे हे विरोधकांचे छडयंत्र*

*भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट व रोखठोक मांडली भूमिका*

*मोठ्या मताधिक्याने निलेश राणे विजयी होतील याबाबतही चिंदरकर यांनी व्यक्त केला ठाम विश्वास*

*मालवण | प्रतिनिधी*

निलेश राणे हे कार्यकर्त्यांच्या मागणीखातर मालवण-कुडाळ विधानसभा मतदार संघात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पक्षाच्या आदेशानुसार विधानसभा प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. निलेश राणे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यातून विकासकामांचा धडाका लावला आहे. सोबतच विरोध पक्षातील अनेकांचा भाजपामध्ये होत असलेल्या पक्षप्रवेशामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत चालली आहे. यातूनच सोशल मिडीयाचा वापर करून निलेश राणे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार म्हणून वावड्या उठवल्या जात आहे. मात्र खुद्द निलेश राणे यांनीच अनेकवेळा आपण लोकसभा निवडणूक लढविणे बाबत इच्छुक नसल्याचे पक्षाकडे आणि कार्यकत्यांकडेही जाहीर केलेले आहे. यामुळे त्यांच्या नावाची चर्चा करून काही जण आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणीही काहीही बोलले तरी निलेश राणे हे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून भाजपाचे उमेदवार निश्चित असून त्यांचा विजयही मोठ्या मताधिक्याचा असेल. असा ठाम विश्वास भाजपा मालवण तालुकाध्यक्ष

धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केला.

भाजपा तालुका कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत चिंदरकर बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन

समिती सदस्य अशोक सावंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुका सरचिटणीस महेश

मांजरेकर, माजी सभापती सुधीर साळसकर, अजिंक्य पाताडे, माजी उपासभापती राजू परूळेकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन

गावकर, संचालक आबा हडकर, नांदोस उपासरपंच विजय निकम, मोहन कुबल तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!