कातकरी समाजाच्या चेहऱ्यावर फुलविले हसु

कातकरी समाजाच्या चेहऱ्यावर फुलविले हसु

*कोंकण Express*

*कातकरी समाजाच्या चेहऱ्यावर फुलविले हसु*

*आज दिनांक १६/०१/२०२४ रोजी कणकवली कांबळे गल्ली, बाबा भालचंद्र नगर, गणपती साना येथे कातकरी समाजाच्या वस्ती मध्ये “माऊली मित्र मंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचे सल्लागार ,पदाधिकारी व सदस्य मंडळींनी भेट दिली,

*सर्व मंडळाचे आधारस्तंभ व जेष्ठ पत्रकार अशोक काका करंबेळकर यांचे संकल्पनेतून, सल्लागार दादा कुडतरकर, सल्लागार व शालेय मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय मालंडकर यांच्या हस्ते मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत गणपती साना येथे गेली कित्येक वर्षे वस्तीला असणाऱ्या कातकरी समाजाच्या सर्व कुटुंबांना सोलापूरी चादर व बेडशीट आदरपूर्वक भेट दिली,

*यावेळी अविनाश गावडे बाबुराव घाडिगावकर ,विशाल रजपूत, महेश मेस्त्री, भगवान कासले, प्रभाकर कदम,लक्ष्मण महाडीक, सईद नाईक, हेमंत नाडकर्णी, महेश वांयगणकर, प्रसाद उगवेकर, प्रसाद पाताडे, सचिन कुवळेकर, इन्शुरन्स सल्लागार साळसकर, निखार्गे, मोडक, यांच्या सहित सर्व मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थितीत होते,

*दादा कुडतरकर यांनी असे प्रतिपादन केले की, माऊली मित्र मंडळ जुने भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ यांच्या सौजन्याने आज येथे चादर व बेडशीट देऊन जो सन्मान करण्यात आला आहे, आणि संत तुकारामांच्या उक्ती प्रमाणे माऊली मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते कार्य करत आहेत, तसेच यापुर्वी हि पेडणेकर यांच्या मंडळांनी सर्वच स्तरातील व्यक्तींचा सत्कार, सन्मान केलेला आहे, संजय मालंडकर यांच्या बद्दल हि दादा कुडतरकर यांनी गौरवोद्गार व्यक्त करून मालंडकर यांच्या कार्याची प्रशंसा केली,

*सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर यांनी असे म्हटले की,या समाजाच्या सोबतच राजु पेडणेकर आणि मी लहानाचे मोठे झालो, आमचा जन्मच या बाबा भालचंद्र नगरीत झाला, कांबळे गल्लीत झाला, त्यामुळे या समाजाच्या सर्व व्यथा चिंता आम्ही जानतो, आणि सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे, हे बांधव नदी किनाऱ्यावर वसलेले असल्यामुळे, त्यांना ब्लॅंकेटची आवश्यकता ओळखुन, राजुने या समाजासाठी ही भेट दिली, तसेच मालंडकर यांनी सर्व मंडळांचे आभार मानले,

*यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर, संजय मालंडकर, दादा कुडतरकर, पत्रकार रविकांत जाधव उपस्थितीत होते  यांनी तसेच सर्व मित्र मंडळाच्या पदाधिकारी व सदस्य मंडळींनी कातकरी समाजाच्या वस्तीची पाहणी करून, शासन दरबारी पाठपुरावा करून आवश्यक त्या मुलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी आश्वासित केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!