संजय राजाराम राऊत म्हणजे महाराष्ट्राने थुंकलेले पान ;आमदार नितेश राणे यांचा घणाघात

संजय राजाराम राऊत म्हणजे महाराष्ट्राने थुंकलेले पान ;आमदार नितेश राणे यांचा घणाघात

*कोंकण Express*

*संजय राजाराम राऊत म्हणजे महाराष्ट्राने थुंकलेले पान ;आमदार नितेश राणे यांचा घणाघात*

*पवनपुत्र हनुमान यांनी रावणाची लंका जाळली तशीच देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांची लंका जाळली*

*उद्धव ठाकरे भाजपकडे पायघड्या घालत आहेत,आदित्य आणि तेजस ची शपथ घ्यावी*

*कणकवली ः प्रतिनिधी*

तीनपट संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राने खावून थुंकलेले पान आहे. त्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची लायकी नाही.जशी पवनपुत्र हनुमान यांनी रावणाची लंका जाळली तशीच तुझ्या मालकाची लंका देवेंद्र फडणवीस यांनी पवनपुत्र हनुमान च्या रुपात जावून जाळली आहे.हे लक्षात ठेवा.२०१९ ला महाराष्ट्र विरोधी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली ती भूमिका आणि ते पाप जाळून महायुतीच्या रूपाने महाराष्ट्र राज्यात रामराज्य आलेले आहे. अशा शब्दात उबाठा पक्षाला भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी सुनावले. कणकवली ओम गणेश निवासस्थानी पत्रकारांशी ते बोलत होते.
विश्व पुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्रात आले आहेत. महत्वाची उद्घाटने,आणि विकासकामे होत आहेत.नाशिक येथे देवदर्शन घेणार आहे. त्यावर लायकी नसलेले संजय राऊत यांनी टीका करून स्वतःची लाल करून घेत आहे.या भांडुपच्या देवानंद संजय राऊत ने मोदी साहेब यांच्या दौऱ्याचा अभ्यास करावा.नंतर टीका करावी.
कोणत्याही राज्यात, जिल्हामध्ये मोदी साहेब जातात तेव्हा प्रमुख देवतांचे दर्शन घेणे हे आमच्या हिंदुत्ववादी विचारांचे पंतप्रधान म्हणून त्यांची पद्धत आहे.त्यामुळे स्वतःची लायकी ओळखून संजय राऊत ने बोलावे असे नितेश राणे यांनी बजावले.
आमच्या नेत्यांच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा मातोश्रीवर एक दुसऱ्याचे कपडे फाडत आहेत त्याची माहिती द्या. तेजस ठाकरे यांच्या लॉन्चिंग च्या नावाने भांडणे चालू आहेत.तेजसच्या लॉन्चिंगबाबत हा राऊत आदित्य आणि तेजस यांच्यात भांडणे लावतोय. उद्धव ठाकरे यांची उरली सुरली लंका जळते आहे.त्याला तूच जबाबदार आहेत.अशी टीका संजय राऊत याचेवर केली.
आदित्य ठाकरे आमच्या पक्ष श्रेष्ठींना भेटण्यासाठी पायघड्या घालून आहेत.आणि इकडे टीका करत आहे. उद्धव ठाकरे यांनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे की, ते भाजपकडे पायघड्या घालत आहेत.उरली सुरली उबाठा वाचविण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे वाघच होते मात्र उद्धव ठाकरे हे मांजर झालेले आहेत अशी टीका केली
त्या वेळी सामानाचे पगारी नोकर म्हणून कोर्टात गेलास म्हणून शहीद म्हणता येत नाही.
राम मंदिर लढा दिला त्यावेळी उद्धव ठाकरे कॅमेरा साफ करत होते.हेच उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील सर्वात मोठा दलाल आहे.
ज्यांनी रावण बनून प्रभू श्रीरामाला विरोध केला ते आज श्रीरामाची आरती ओवाळत असतील तर हा हिंदू धर्माचा विजय आहे.
संजय राऊत आणि उगाठा सेना नाशिक मध्ये आरती होणार असतील अशीच पत्रा चाळ मधील श्री राम मंदिर मध्ये जावून पूजा करावी.
घराण्याबद्दल बोलण्यापूर्वी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मातोश्री वर जावून चर्चा करावी.मग तुमचे विरोधी पक्षनेते पद राहते काय पहा असे सुनावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!