*कोंकण Express*
*कणकवली पर्यटन महोत्सवाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते थाटात उद्घाटन*
*सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास आराखडा पुढच्या वर्षी ३०० कोटींचा होणार ; रविंद्र चव्हाण*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली पर्यटन महोत्सवाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने थाटात उद्घाटन झाले. यावेळी श्रीफळ जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या श्रीफळ वाढवण्यात आले. त्यानंतर फटाक्यांची जोरदार आतीशबाजी करण्यात आली. सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
अयोध्या येथे २२ जानेवारीला भव्य असे श्रीरामाचे मंदिर तयार होत आहे. सर्वांनी २२ जानेवारी सोहळ्या दिवशी घरात पणत्या, दीवे लाऊन दिवाळी साजरी करायचे आहे. ५०० वर्षानंतर हा योग आला आहे. या योगाचा लाभ हिंदूंनी जरूर घ्यावा .जाणवली पुलासाठी ८ कोटी पेक्षा जास्त नीधी मंजूर झाला आहे कणकवली शहरासाठी लागेल तेवढा निधी दिला जाईल. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास आराखडा पुढच्या वर्षी ३०० कोटींचा होईल. पाणबुडी प्रकल्प हा वेंगुर्ले येथेच होणार आहे. नारायण राणे यांनी सुरु केलेला पर्यटन जिल्हा संकल्पनेतून पर्यटन वृदिगत होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.
आ. नितेश राणे म्हणाले, कणकवली शहरातील नागरिकांचे आनंदाचे काही दिवस जावेत, या हेतूने हा महोत्सव सुरु केला आहे. मुंबई आणि मोठ्या शहराप्रमाणे या ठिकाणी लोकांना मनोरंजन व्हावे, या साठी हा महोत्सव आहे. आता प्रशासक आहे तरीही आम्ही सुरु केलेली प्रथा आम्ही चालू ठेवली आहे. आम्ही कणकवली शहरातील लोकांना दिलेला शब्द पाळत आहोत, कणकवलीतील लोकांमुळे आम्ही शहराची सत्ता मिळवली आहे. राणे आणि जनतेच नात आजही घट्ट आहे. कणकवली नगरपंचायतचे नाव आले की निधीवर काट मारली जात होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर निधीची कमतरता नाही. मागण्यापेक्षाही निधी देण्याचे काम ना. रवींद्र चव्हाण करीत आहेत. कुठलाच प्रश्न मागे ठेवला नाही, कणकवलीकरानी आता दिलेला शब्द आणि करत असलेली प्रगती नागरिक म्हणून विचार केला पाहिजे. विकासातील असंख्य महत्वाचे निर्णय घेतले आहेत. आमचे समीर नलावडे आणि बंडू हर्णे यांचा सार्थ अभिमान आहे. जाणवली बीज मागणी केली त्याचा शब्द पालकमंत्र्यांनी पूर्ण केला आहे. आता व्यापाऱ्यानी काही प्रश्न मांडले, त्याची आमची जबाबदारी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट आमचे सिंधुदुर्ग सुंदर असल्याचे करा. सोशल मीडियावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात लक्ष वेधल गेले. सचिन तेंडुलकर यांनीही ट्विट करत सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे लक्ष वेधलं आहे. आपल्या लोकांनी पण सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
प्रस्ताविक करताना माजी नगराध्यक्ष सगीर नलावडे म्हणाले, सत्ता असो किंवा नसो जनतेचे काम करत राहायचे, राणेंची शिकवण आहे. त्यानुसार आ. नितेश राणेंनी आम्हाला सांगितले, की पर्यटन महोत्सव याही वर्षी जोमाने करा. त्यामुळे आ. नितेश राणेंचे कणकवलीकरानी आभार मानले पाहिजेत. पर्यटन जिल्हा घोषित करण्यात ना. नारायण राणे यांनी केला. त्यामुळेच हा दिवस आम्ही पाहत आहोत, कणकवलीत राज्याच्या सत्तेच्या माध्यमातून विकास करु शकलो आहे. गोव्या च्या धर्तीवर कला अकादमी झाली तर स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळेल. ती मागणी पालकमंत्री आणि आमदारांनी पूर्ण करावी. या ठिकाणी स्टॉल धारकांना व्यवसायासाठी संधी दिली आहे. जिल्ह्यात विकासात पर्यटनातून मोठा हातभार लाभत आहेत.
यावेळी आ. नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी नगरसेवक संजय कामतेकर, अभिजीत मुसळे, विराज भोसले, कविता राणे, मेधा सावंत, मेघा गांगण,प्रतीक्षा सावंत, शिशिर परुळेकर, अण्णा कोदे, महेश सावंत, किशोर राणे, बाळा सावंत, बाबू गायकवाड, यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.