*कोंकण Express*
*कणकवली शहरातील सुसज्ज शौचालयाच्या इमारतीचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले लोकार्पण*
*माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या कारकिर्दीत झाला होता इमारत बांधण्याचा शुभारंभ*
*नागरिकांच्या मागणीची झाली पूर्तता, आता कोणाचीच गैरसोय होणार नाही*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली नगरपंचायतीच्या वतीने आप्पासाहेब पटवर्धन चौकातील जुन्या भाजी मार्केट येथे नव्याने बांधण्यात आलेल्या आणि सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या शौचालयाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण करण्यात आले. या उद्घाटनासाठी नगपंचायत चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतीतोष कंकाळ, भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष प्रज्ञा ढवण, तालुका अध्यक्ष मिलिंद मिस्त्री, भाजी मार्केटमधील व्यापारी राजेंद्र पेडणेकर युवक चे गणेश तळेगावकर, तसेच भाजी मार्केट मधील व्यापारी, दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

