कणकवली पर्यटन महोत्सवाचा शोभयात्रेने शानदार शुभारंभ

कणकवली पर्यटन महोत्सवाचा शोभयात्रेने शानदार शुभारंभ

*कोंकण Express*

*कणकवली पर्यटन महोत्सवाचा शोभयात्रेने शानदार शुभारंभ…!*

*शहरातून ढोल ,ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा…!*

*कांतरा, शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेले देखावे व भव्य गणेश मूर्ती असे १७ ही देखावे ठरले लक्षवेधी…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी ११ जानेवारी रोजी सायंकाळी शहरातून ढोल ,ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. श्री पटकीदेवी मंदिराकडून बाजारपेठ मार्गे अप्पासाहेब पटवर्धन चौकातून येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील पर्यटन महोत्सवाच्या स्थळापर्यंत ही शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत चित्ररथ, बैलगाड्या,कार्टून्स दशावतारी कलाकार यांचा सहभाग असलेली भव्य दिव्य शोभा यात्रा काढण्यात आली.

यावेळी शोभायात्रेचे शुभारंभ श्री.राणे यांच्या हस्ते झाला.यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक संजय कामतेकर, अभिजीत मुसळे, विराज भोसले, कविता राणे, मेघा सावंत, प्रतीक्षा सावंत, शिशिर परुळेकर, अण्णा कोदे, महेश सावंत, किशोर राणे, बाळा सावंत, रवींद्र गायकवाड, निखिल आचरेकर, यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कणकवली शहरातील विविध प्रभागांचे चित्ररथ व पारंपारिक वेशभूषा तसेच कोकणच्या संस्कृतीचे दर्शन या शोभायात्रेतून घडविण्यात आले. बैलगाड्यांसह दशावतारी कला संस्कृती सुद्धा या शोभायात्रेतून दाखविण्यात आली. या शोभायात्रेत प्रभाग १३ – छत्रपती शिवाजी महाराज, प्रभाग ६ -राम लक्ष्मण प्रतिमा , कांतारा, कालीमाता चित्ररथ, विष्णू अवतार चित्ररथ ,नंदी – हनुमान – गणपती यांचा देखावा,शाळा न.३ विद्यार्थ्यांनी साकारलेला राम वनवास देखावा,शाळा न.५ विद्यार्थ्यांनी साकारलेला छत्रपती शिवाजी महाराज व मावळे असलेला देखावा,शाळा न.१ विद्यार्थ्यांनी साकारलेला वारकरी बांधव विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाताना,७ बैलगाड्या सहभागी होत्या,त्यामध्ये दशावताराच्या वेशभूषेत असलेले कलाकार दिसून येत होते.
कणकवली पटकीदेवी समोरून कणकवली महोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमाच्या शुभारंभ पूर्वी शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सिंधू गर्जना ढोल पथकाच्या निनादात पटकीदेवी कडून बाजारपेठ मार्गे सुरू झालेली ही शोभायात्रा पर्यटन महोत्सव स्थळापर्यंत पोहचली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!