शरीरसौष्ठव “सिंधु श्री चा मानकरी कणकवलीचा गणेश सरवंदे तरबेस्ट पोजर राजेंद्र बेंडबे (कुडाळ) ठरले.

शरीरसौष्ठव “सिंधु श्री चा मानकरी कणकवलीचा गणेश सरवंदे तरबेस्ट पोजर राजेंद्र बेंडबे (कुडाळ) ठरले.

*कोंकण Express*

*शरीरसौष्ठव “सिंधु श्री चा मानकरी कणकवलीचा गणेश सरवंदे तरबेस्ट पोजर राजेंद्र बेंडबे (कुडाळ) ठरले.*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले.*

शरीरसौष्ठव स्पर्धेत उतरताना खूप मेहनत घ्यावी लागते. मेडीकल स्टोअर्स मधील घेऊन शरीरसौष्ठव होत नाही.यासाठी व्यायाम व कष्ट करावे लागतात. नुसते शरीरसौष्ठव क्षेत्रात उतरून उल्लेखनीय कामगिरी बरोबर जीवनात उच्च शिक्षण घेऊन मोठे व्हा असे मार्गदर्शन जगातिक शरीरसौष्ठव स्पर्धेत दोनवेळा व भारतीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील आठवेळेचे विजेते शरीरसौष्ठव पट्टू संग्राम चौगुले यानी केले.सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने तळेरे येथील फ्लेक्स फिटनेस व एसआरकेस फिटनेस आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभात तळेरे येथे बोलत होते. यावेळी झालेल्या सिंधु श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचा सिंधु श्री २०२४ चा मानकरी एसआरकेस फिटनेस कणकवलीचा गणेश सरवंजे ठरला.तर बेस्ट पोझर राजेंद्र बेंडबे, कुडाळ व मोस्ट इम्प्रुवड बाॅडी बिल्डर ओमकार कारेकर यानी पटकाविला.यावेळी संग्राम चौगुले याच्या शुभहस्ते शरीरसौष्ठव स्पर्धेचे व तळेरे येथे नव्याने सुरू झालेल्या फ्लेक्स फिटनेस या अत्याधुनिक व्यायामशाळेचा फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी सरपंच हनुमंत तळेकर, माजी सभापती दिलिप तळेकर,उद्योजक दिपक पाताडे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुर्यकांत तळेकर,राष्ट्रीय पंच रामकृष्ण चितळे, विजय मोरे,किशोर सोंन्सुरकर,संजय पाताडे,प्रकाश पाताडे, अजय पाताडे, प्रणिल शेटये,तेजस जमदाडे,सहदेव खाडये,प्रणय जोशी, तेजस जमदाडे, अभिमन्यू पाताडे,अमोल तांडेल,हेमंत नाईक,सुधीर हळदणकर,अंकित सोंन्सुरकर,सौरभ वारंग,विशाल कसालकर,सुंदर कोरगांवकर आदी उपस्थित होते.शरीरसौष्ठव स्पर्धेत विविध वजनी गटात अनुक्रमे पुढील शरीरसौष्ठव पट्टूनी यश संपादन केले. यात ५० – ५५ किलो. वजनी गटात राजेंद्र बंडबे,कुडाळ,प्रथमेश पारकर कसाल, शुभम हळदिवे,फ्युचर फिटनेस, रूपेश वंजारे, सौरभ कोयंडे, ५५ – ६० किलो वजनी गटात ओमकार कारेकर, चिंतामनी कांबळी, दिनकर आखेरकर, शेरबहाद्दूर भोगटे, शंकर माने, ६० – ६५ किलो वजनी गटात गणेश सरवंजे, सलमान त्यागी, सागर साटम, योगेश मेस्त्री, सैजाद साटविलकर, ६५ – ७० किलो वजनी गटात ओम सावंत,सहदेव नार्वेकर, श्रुशी वायंगणकर, ज्ञानेश्वर हळवे,आमान गिरकर, ७० किलो खुल्या वजनी गटात विपुल घोगळे,अमित कदम,देवेश लाड, हेमंत चव्हाण, दिप सावंत यानी यश संपादन केले. सर्व विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. एकूण ३८ शरीरसौष्ठव पट्टूनी स्पर्धेत सहभाग घेऊन प्रथम स्थानावरील स्पर्धकांना पिंपरी-चिंचवड येथे होणा-या स्पर्धेत थेट प्रवेश देण्यात येत संग्राम चौगुले यानी विजेत्याना आपल्याकडून बक्षिस देत काही पोझ उपस्थितांना दाखवत दाद मिळवली. यावेळी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील नवोदित शरीरसौष्ठव व नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!