*कोंकण Express “
*फोंडाघाट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा रक्तदान शिबिरात सहभाग*
*मुलींची हिमोग्लोबिन तपासणी संपन्न*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटचे विद्यार्थी आर.के. ग्रुप फोंडाघाट त्यांच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सहभागी झाले.प्राथमिक आरोग्य केंद्र फोंडाघाट येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात महाविद्यालयाच्या एनसीसी एनएसएस व डी एल एल इ विभागाच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी व महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला व रक्तदान शिबिर यशस्वी केले. त्याचबरोबर मुलींची हिमोग्लोबिन तपासणी सुद्धा संपन्न झाली.
सुरुवातीला महाविद्यालयात रक्तदाना विषयी प्रबोधन करण्यात आले. त्यावेळी बोलताना प्रा. जगदीश राणे म्हणाले की रक्तदान ही एक सामाजिक चळवळ आहे. त्या चळवळीत सर्वांनी स्वेच्छेने सहभागी झाले पाहिजे कारण रक्त दिल्यानेच रक्त निर्माण होते. जगात सर्व गोष्टी प्रयोगशाळेत तयार झाल्या परंतु रक्त तयार करता केले जात नाही. ते तयार होण्याची प्रयोगशाळा म्हणजे फक्त शरीरच आहे. त्याचबरोबर रक्त दिल्याने रक्तदात्यांच्या शरीरात रक्त नवीन येते. गरजवंताची गरज भागल्याचे समाधानही आपल्याला मिळते. त्याचबरोबर रक्तदान केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या केल्या जातात व त्यासाठी कोणताही खर्च नसतो त्यामुळे समाधान आणि आपली बचत यासाठी रक्तदान महत्त्वाचे आहे.
या प्रबोधन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बालाजी सुरवसे यांनी केले तर व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य डॉ. संतोष रायबोले व प्रा. विनोद पाटील होते.