आर ओ डब्ल्यू लाईन झाल्यावरच गटाराचे काम.

आर ओ डब्ल्यू लाईन झाल्यावरच गटाराचे काम.

*कोकण Express*

*आर ओ डब्ल्यू लाईन झाल्यावरच गटाराचे काम….*

*हायवे ठेकेदाराच्या अधिकाऱ्यास नगराध्यक्ष समीर नलावडे यांची सूचना*

*कणकवली ः  प्रतिनिधी*

शहरातील पटवर्धन चौकात लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्स समोर सर्व्हिस रोड लगत आर ओ डब्ल्यू लाईन निश्चित करून नंतर गटारे बांधावीत अशा सूचना देत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सुरू असलेले गटाराचे काम बंद पाडले. येत्या सोमवारी नगराध्यक्ष दालनात हायवे ठेकेदाराच्या अधिकाऱ्यांसोबत याबाबत नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने चर्चा करून नंतर पुढील काम केले जाईल असे नगराध्यक्ष नलावडे यांनी सांगितले.
हायवे चौपदरीकरणात मुळातच अरुंद असलेल्या सर्व्हिस रोड लगत गटार बांधण्याचे काम हायवे ठेकदार करत होता. लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्स समोर मुळातच शहरातील इतर ठिकानांपेक्षा अरुंद रस्ता आहे. त्यातच आर ओ डब्ल्यू लाईन अद्याप निश्चित झालेली नाही आहे. आर ओ डब्ल्यू लाईनच्या बाहेर १ मीटर जागा पाणीपुरवठा करणाऱ्या नगरपंचायत च्या पाईपलाईन साठी आवश्यक आहे. तशी कोणतीही जागा न सोडता ठेकेदार स्वतःचे काम आटोपण्यासाठी घाईगडबडीने गटार काम करत होता. ही बाब नगराध्यक्ष समीर नलावडे याना समजताच तात्काळ नलावडे यांनी पटवर्धन चौकात सहकारी नगरसेवकांसह धाव घेतली. जोपर्यंत आर ओ डब्ल्यू लाईन निश्चित होऊन नगरपंचायत च्या पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन साठी जागा सोडली जात नाही तोवर गटाराचे काम करू नये अशा सूचना नगराध्यक्ष नलावडे यांनी दिल्या. एकदा गटार काम झाले की नगरपंचायत ला दुकानदारांना पाणीपुरवठा करणेही शक्य होणार नाही. त्यामुळे आधी कणकवलीवासीयांच्या हितासाठी सविस्तर चर्चा करून नंतरच काम सुरू केले जाईल अशी माहिती नगराध्यक्ष नलावडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!