*कोंकण Express*
*तळेरे येथे बुधवारी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे नेहरू युवा केंद्रामार्फत आयोजन*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले.*
भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग नगरी यांचेवतीने बुधवारी (ता. 10) सकाळी 10 वा. जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा 15 ते 29 वर्षे वयोगटासाठी असून 7 मिनिटांचा वेळ मिळेल. स्पर्धक मेरा भारत विकसित भारत@2047 असा विषय असून स्पर्धक मराठी, हिंदी अथवा इंग्रजी भाषेत विषय मांडायचा आहे. जिल्हास्तरीय विजेत्या प्रथम तीन विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. तर सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होईल. त्यामध्ये प्रथम चार विजेत्यांना 1 लाख, 50 हजार व 25 हजाराची दोन बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्हास्तरीय स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या अधिक माहिती आणि सहभागासाठी श्रावणी मदभावे (7719858387) किंवा निकेत पावसकर (9860927199) यांच्याशी संपर्क साधावा.