‘शलभ’ च्या सीमा राणे यांना ‘आम्ही लेकी सावित्रीच्या पुरस्कार’ : मुंबई येथे झाला गौरव

‘शलभ’ च्या सीमा राणे यांना ‘आम्ही लेकी सावित्रीच्या पुरस्कार’ : मुंबई येथे झाला गौरव

*कोंकण Express*

*’शलभ’ च्या सीमा राणे यांना ‘आम्ही लेकी सावित्रीच्या पुरस्कार’ : मुंबई येथे झाला गौरव*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले.*

नाधवडे येथील ‘शलभ’ या फुलपाखरांच्या गार्डनच्या संचालिका सीमा राणे यांना मुंबई येथे आम्ही लेकी सावित्रीच्या गौरव पुरस्कार 2024 देऊन गौरविण्यात आले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.निसर्गाने दिलेल्या देणगीच संवर्धन करण्याचा ध्यास हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घेऊन सौ. सीमा संजय राणे यांनी शलभ गार्डनची निर्मिती तळेरे वैभववाडी मार्गावरील नाधवडे येथे केली. जैविक विविधता तसेच फुलपाखरू आणि त्याचे महत्त्व ओळखून शलभ गार्डनमध्ये फुलपाखरांना लागणारे वातावरण तसेच पक्षी निरीक्षण आणि इतर गोष्टींसाठी भाग तयार केले. कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्हा याच्यात सगळ्यांना आवडते असणारे कोकणी पदार्थ, पर्यटकांची मन जिंकण्याचं आणि पर्यटनाला चालना देण्याचा महत्त्वपूर्ण काम हे शलभ गार्डनमध्ये केले जाते. शलभ गार्डनमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातात. आपल्या जीवनातील आनंदमय क्षण जसे बर्थडे, साखरपुडा तसेच गेट-टुगेदर हे या गार्डनमध्ये साजरी करून अनेक जणांना एक चांगला अनुभव अनुभवायला मिळतो. एका निसर्गरम्य वातावरणामध्ये तुमच्या आवडीचे पदार्थ खायला देण्याची सोय करून तसेच होम स्टे सारखं एक सुविधा देऊन शलभ गार्डन हे अनेक सुविधांनी समृद्ध आहे. एका महिलेने अशा आगळ्यावेगळ्या संकल्पनेला मुहूर्त रूप देऊन ‘शलभ’ च्या माध्यमातून जिल्ह्याच्या निसर्ग संवर्धनात आणि पर्यटन वृद्धीसाठी योगदान देत आहे. याचीच दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!