*कोंकण Express*
*विद्यार्थी आणि शिक्षक जिल्हा विज्ञान प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत*
*जिल्हा विज्ञान प्रदर्शन ताबडतोब घेण्याची शिक्षक भारतीची मागणी*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील तालुका पातळीवरील विज्ञान प्रदर्शन होऊन काही आठवडे लोटले तरी पण जिल्हा प्रदर्शनाची तारीख मात्र अजूनही अंतिम झाली नाही.खरं म्हणजे जिल्हा पातळीवरील प्रदर्शन ताबडतोब होणे गरजेचे आहे, कारण, विद्यार्थी शिक्षक शाळा केवळ या प्रदर्शनामुळे अडकून राहतात, आता तर शिष्यवृत्ती ,दहावी-बारावीच्या परीक्षाही जवळ आल्यात त्यामुळे लवकरात लवकर जिल्हा पातळीवरील विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी शिक्षक भारतीच्यावतीने अध्यक्ष श्री संजय वेतुरेकर आणि सचिव श्री समीर परब यांनी केली आहे.