*कोकण Express*
*बाळशास्री जांभेकरांना पत्रकारदिनी तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवाराचे पोंभुर्ले तेथे अभिवादन*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले.*
६ जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून आद्य पत्रकार आचार्य बाळशास् शात्री जांभेकर यांच्या जन्मगावी पोंभुर्ले येथील स्मारक स्थळी तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवाराच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.*
याप्रसंगी तळेरे येथील जेष्ठ पत्रकार उदय दुधवडकर,प्रमोद कोयंडे,संजय खानविलकर,दत्तात्रय मारकड,संजय भोसले,निकेत पावसकर,अनिल राणे,वैभववाडी येथील पत्रकार संजय शेळके,श्रावणी कॉम्प्यूटरचे संचालक सतीश मदभावे,सुधाकर जांभेकर,तळेरे येथील मुंबई विद्यापीठाच्या दळवी महाविद्यालयातील पत्रकारीता अभ्यासक्रमाचे विभाग प्रमुख प्रा.प्रशांत हटकर तसेच महाविद्यालयातील मास मीडिया विभागाच्या विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या.