*कोंकण Express*
*कणकवली नगरीत जगप्रसिद्ध जादुगार यांचा सन्मान*
आज दिनांक ०७/०१/२०२४ रोजी माऊली मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचे वतीने, संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या संकल्पनेतून, अप्पासाहेब पटवर्धन चौकात जगप्रसिद्ध जादुगार जितेंद्र रघुवीर यांचा सन्मान करण्यात आला,
*सर्व मंडळाचे आधारस्तंभ जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, शशांक श्रीधर मराठे (कौटुंबिक सल्लागार, कुटुंब न्यायालय, पुणे) , सल्लागार सुभाष उबाळे यांच्या उपस्थितीत सौ सीमा शशांक मराठे ( संपादिका, साप्ताहिक, किरात वेंगुर्ले) यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले,
*यावेळी अविनाश गावडे, भगवान कासले, प्रभाकर कदम, बाबुराव घाडिगावकर, सौ भारती, सौ धुरी, सुनिल काणेकर, साळसकर, व्ही एस राणे, नुरूभाई, सर्व मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थितीत होते,
*महाराष्ट्र लाईव्ह, कणकवली चे विराज गोसावी उपस्थितीत होते,
*तसेच अप्पासाहेब पटवर्धन चौकातील रिक्षा व्यावसायिक, स्टॅण्ड नंबर १ , २ , ३ आणि पटवर्धन चौकातील समस्त व्यापारी वर्ग, भाजी विक्रेते उपस्थितीत होते,
*यावेळी जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांनी असे म्हटले की, जादूगार रघुवीर यांच्या तिन्ही पिढ्या या क्षेत्रात असुन, हि तिसरी पिढी आजपर्यंत, आम्ही सर्व जवळुन पहा आलो आहोत, या जादुई दुनियेत त्यांनी नावलौकिक मिळवला असुन, आज त्यांच्या तिसर्या पिढीचा सन्मान करण्याचे भाग्य आम्हा समस्त कणकवली वाली यांच्या वतीने माऊली मित्र मंडळाला लाभले याचा मला मनस्वी आनंद होत आहे,
*या प्रसंगी जादूगार रघुवीर यांनी कणकवली नगरीत माझा सन्मान करण्यात आला, आणि ते ही अप्पासाहेब पटवर्धन चौकात हे मी माझे भाग्य समजतो, अशा भावना व्यक्त केल्या, आणि माऊली मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळांचे आभार व्यक्त केले,
*संस्थापक अध्यक्ष पेडणेकर यांनी असे म्हटले की, हा कार्यक्रम अतिशय घाईगडबडीत आयोजित करण्यात आला, तरी सुद्धा आमच्या शब्दाला मान देऊन सर्व व्यापारी बांधव, रिक्षा व्यावसायिक, भाजी विक्रेते आणि उपस्थितीत सर्व मंडळाचे सल्लागार, पदाधिकारी व संलग्न मित्र मंडळाचे सदस्य यांचे आभार मानले,