माऊली मित्र मंडळाचे वतीने पालकमंत्र्यांना निमंत्रण

माऊली मित्र मंडळाचे वतीने पालकमंत्र्यांना निमंत्रण

*कोकण Express*

*माऊली मित्र मंडळाचे वतीने पालकमंत्र्यांना निमंत्रण*

*आज दिनांक ०६/०१/२०२४ रोजी पत्रकार दिनाच्या निमित्ताने
माऊली मित्र मंडळ व सलग्न सर्व मंडळाचे संस्थापक राजेंद्र मनोहर पेडणेकर आणि मित्र मंडळाचे अविनाश गावडे, बाबुराव घाडिगावकर, प्रभाकर कदम यांनी,

*ओरोस येथील पत्रकार भवनात उपस्थित राहून, प्रथम मराठी भाषेतील आद्य पत्रकार आणि दर्पण या मराठीतील पहिल्या वृतपत्राचे संपादक “बाळशास्त्री जांभेकर” यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार भवनाच्या मध्ये असलेल्या पुतळ्याला पुष्पहार, पुष्पांजली मनोभावे अर्पण करून, त्यांच्या चरणी नतमस्तक झाले,

*यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे, कणकवली तालुकाध्यक्ष दिपक बेलवलकर, दैनिक पुढारी वृत्तपत्र कणकवली चे गणेश जेठे, मंडळाचे सदस्य उपस्थितीत होते,

* याप्रसंगी पत्रकार भवना मध्ये आयोजित कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रविंद्र चव्हाण साहेब उपस्थितीत होते,

*२० जानेवारी २०२४ रोजी जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ ( अप्पासाहेब पटवर्धन चौक, कणकवली) येथील श्री सत्यनारायणाच्या महापुजेच्या निमित्ताने आयोजित नानाविध कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण साहेब यांना आग्रहपूर्वक निमंत्रण दिले ,

*यावेळी पेडणेकर यांनी दिपक बेलवलकर व मंडळाचे सदस्य यांच्या उपस्थितीत अप्पासाहेब पटवर्धन चौकातील व्यापारी मार्केट नव्याने बांधकाम करण्यात संदर्भात चर्चा केली,

*पालकमंत्री साहेबांनी आमंत्रणाचा स्विकार करून, उपस्थितीत राहून, त्यावेळी संपूर्ण व्यापारी मार्केट ची पहाणी करु, व योग्य ते सहकार्य करण्याचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांना आश्वासित केले,

*माऊली मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मंडळींनी पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री यांच्या प्रती आदर व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!