महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती अभिवादन करून माणगाव येथे करण्यात आली साजरी

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती अभिवादन करून माणगाव येथे करण्यात आली साजरी

*कोंकण Express*

*महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती अभिवादन करून माणगाव येथे करण्यात आली साजरी*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

‘दर्पण’ हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू करणारे आद्य वृत्तपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज पत्रकार दिनाचे औचित्य साधून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून आज शनिवारी माणगाव पोलीस दुरक्षेत्र येथे साजरी करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आबा खवणेकर,उपाध्यक्ष समिल जळवी,सहसचिव कृष्णा सावंत,सदस्य मिलिंद धुरी,सदस्य आनंद काडंरकर,माणगाव पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सखाराम भोई,हेड कॉन्स्टेबल आनंद पालव,माणगावचे सामाजिक कार्यकर्ते आजिस शेख आदि पत्रकार तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!