*कोंकण Express*
*युवासेनेच्या कणकवली मतदार संघातील कामा बद्दल युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून कौतुक*
*आदित्य ठाकरेंच्या हस्ते युवा सेनेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन*
*गेल्या वर्षभरातील युवासेनेच्या कामाचा घेतला आढावा*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदार संघामधील युवा सेनेच्या गेल्या वर्षभरातील कामाचा आढावा युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी नुकताच मातोश्रीवर घेतला. या आढाव्या प्रसंगी युवा सेनेने राबविलेल्या वेगवेगळ्या उपक्रम व आंदोलनांची माहिती आदित्य ठाकरे यांना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली. दरम्यान जनतेचे प्रश्न घेऊन कणकवली विधानसभा मतदारसंघात युवा सेनेचे कार्य उल्लेखनीय असल्याचे गौरव उद्गार देखील आदित्य ठाकरे यांनी काढले. दरम्यान युवासेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा दिनदर्शिका चे प्रकाशन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. कणकवली मतदार संघात 10 हजार जणां पर्यंत ही दिनदर्शिका वितरण करण्यात येणार आहे. अशी माहिती सुशांत नाईक यांनी दिली. यावेळी विस्तारक अमित पेडणेकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.