सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल भाजपा च्या वतीने मा. नगराध्यक्ष राजन गिरप यांचा सत्कार

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल भाजपा च्या वतीने मा. नगराध्यक्ष राजन गिरप यांचा सत्कार

*कोकण Express*

*सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल भाजपा च्या वतीने मा. नगराध्यक्ष राजन गिरप यांचा सत्कार*

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या शिफारशीनुसार वेंगुर्ले नगरपरिषदेचे मा.नगराध्यक्ष राजन गिरप यांची सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल भाजपा च्या वतीने सावंतवाडी विधानसभा प्रमुख व मा.आम.राजन तेली यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
भाजपा महाराष्ट्र आयोजीत ” नमो चषक ” भव्य क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या वेंगुर्ले तालुक्याच्या नियोजनाची बैठक मा.आम.राजन तेलीसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा मोर्चा व बेसिक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती . यावेळी रेडी , उभादांडा , तुळस , आडेली , म्हापण इत्यादी पाच जि. प.मतदार संघात व वेंगुर्ले शहरात स्पर्धेचे नियोजन करण्यात आले . तसेच विविध समीत्या स्थापन करून जबाबदारी सोपविण्यात आली.
यावेळी श्री प्रसन्ना देसाई ( जिल्हा उपाध्यक्ष) , श्री सुहास गवंडळकर (तालुकाध्यक्ष) , जिल्हा उपाध्यक्ष अँड. सुषमा खानोलकर , जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक , सत्याविजय गावडे (अनसुर सरपंच), श्री सुनील मठकर ,श्री गणेश मनोहर गावडे (शक्ती केंद्र प्रमुख), श्री प्रितम जगन्नाथ सावंत , श्री तुषार साळगांवकर, प्रसाद कृष्णा पाटकर ( तालुकाध्यक्ष युवा मोर्चा) , श्री बंड्या पाटील (पालकरवाडी सरपंच), श्री नितीन चव्हाण ( ता.चिटणीस), माजी सभापती श्री निलेश सामंत, क्रिडा प्रकोष्ठ निशांत तोरसकर , नमो चषक संयोजक हेमंत गावडे , श्री हितेश धुरी , श्री बाबली वायंगणकर ( तालुका सरचिटणीस), ता.चिटणीस समीर कुडाळकर , श्री वैभव होडावाडेकर(तुळस युवा मोर्चा), श्री भूषण सारंग , महीला मोर्चाच्या सौ वृंदा गावंडळकर , श्री भूषण आंगचेकर, श्री प्रणव वायंगणकर (युवा मोर्चा),श्री शशिकांत करंगूटकर , श्री रुत्विक आंगचेकर , बुथप्रमुख सुधीर पालयेकर , सोशल मिडीयाचे श्रीकृष्ण( राजू ) परब व अमेय धुरी , बुथप्रमुख शेखर सुरेश काणेकर ,आसोली उपसरपंच संकेत संदीप धुरी , शक्तिकेंद्र प्रमुख श्यामसुंदर मुननकर, श्री मारुती दोडानशेट्टी, श्री विष्णू परब ( सरपंच अध्यक्ष), श्री रविंद्र शिरसाट , श्री हर्षद साळगावकर, श्री कमलेश गावडे व श्री जगन्नाथ राणे (शक्ती केंद्र प्रमूख) इत्यादी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!