*कोंकण Express*
*माऊली मित्र मंडळाचे वतीने गोडाचे वाटप*
काल दिनांक ०३/०१/२०२४ रोजी महिला मुक्तीदिनाचे औचित्य साधून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने माऊली मित्र मंडळ, नगरपंचायत जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ, राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्र व शालेय मित्र मंडळ, ॐ नमो भगवते भालचंद्राय मित्र मंडळ यांच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना विन्रम अभिवादन करण्यात आले,
याच दिवशी पेडणेकर यांचे चिरंजीव रोहित राजेंद्र पेडणेकर यांच्या लग्नाच्या वाढदिवसा निमित्ताने अप्पासाहेब पटवर्धन चौकातील भाजी व हारतुरे विक्रेत्यांना, रिक्षा व्यावसायिकांना तसेच उपस्थितीत नागरिकांना मिठाई वाटप करण्यात आले,
व्यापारी बांधवांना चहा नष्ट देऊन, वाढदिवस साजरा करण्यात आला,
*यावेळी राजु म्हापसेकर, अविनाश गावडे, सईद नाईक, प्रसाद पाताडे ,बाबुराव घाडिगावकर, हेमंत नाडकर्णी, सचिन कुवळेकर, लक्ष्मण महाडीक, भगवान कासले, नुरूभाई, जमिल कुरैशी, जवु जैतापकर, बाबुराव चहावाला, बशिर, प्रसाद उगवेकर, विशाल रजपूत ,महेश वांयगणकर आदी सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थितीत होते,