*कोंकण Express*
*महाराष्ट्र राज्य पोलीस स्थापना दिनानिमित्त कणकवली पोलीसांचा गौरव*
आज दिनांक ०२/०१/२०२४ रोजी महाराष्ट्र राज्य पोलीस स्थापना दिनानिमित्त कणकवली पोलीस ठाण्यात पोलीसांचा प्रतिकात्मक गौरव अधिकार्यांच्या माध्यमातून करण्यात आला,
*व्यापारी महासंघाचे कणकवली तालुकाध्यक्ष दिपक बेलवलकर, जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, विलास गावकर यांच्या उपस्थितीत श्री अमित यादव साहेब, कणकवली पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मनोज पाटील साहेब यांच्या सहित त्यांच्या सहकाऱ्यांचा गौरव करण्यात आला,
*माऊली मित्र मंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र, राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्र मंडळ व शालेय मित्र, ॐ नमो भगवते भालचंद्राय मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष यांच्या उपस्थितीत जेष्ठ पत्रकार व सर्व मंडळाचे आधारस्तंभ अशोक करंबेळकर आणि मंडळांच्या सदस्यांच्या उपस्थितीत, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील, पोलीस नाईक चंद्रकांत माने, पोलीस कॉन्स्टेबल संतोष शिंदे यांचा शाल, श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला,
*यावेळी जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांनी असे प्रतिपादन केले की, आपल्या घरातील सणवार विसरून, प्रसंगी आपल्या तब्येतीची काळजी न घेता, समाजातील घटकांसाठी अहोरात्र झटणारे पोलीस दल आणि सैन्य दल, आज २ जानेवारी हा महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचा स्थापनेचा दिन असल्याने, या दिनाचे औचित्य साधून कणकवली पोलीस स्टेशन च्या सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांच्या दोन पोलीस बांधंवाचा, आज आम्ही प्रतिकात्मक गौरव केलेला आहे, गौरव करण्या मागील उद्देश हाच आहे कि, त्यांच्या निरंतर सेवे मुळे समाज निर्धास्त पणे निर्धोक पणे आपली कामे पार पाडत असतो, निर्धास्त पणे झोप घेऊ शकतो, आणि एवढे असुनही, आपल्या समाजातून कायमच त्यांना लक्ष केल जात, आणि मग आम्हा नागरिकांना कुठ तर संधी मिळते, कि त्यांचा आम्ही गौरव करण गरजेच च असत, म्हणून आज आम्ही सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या कर्मचार्यांचा गौरव केलेला आहे, यापुढेही ते अशाच सेवा देतील, याची आम्हाला खात्री आहे, या अशा सत्कारांची त्यांना अपेक्षा हि नसते तसेच गरजही नसते, कारण ते प्रामाणिक पणे आपल कर्तव्य बजावत असतात, आणि म्हणूनच ते आमच कर्तव्य ठरत कि आम्ही त्यांच्या मेहनतीचे कौतुक कराव, आणि आजचा दिवस यासाठी योग्य दिवस आहे, अस आम्हाला वाटत,
*राजेंद्र मनोहर पेडणेकर असे म्हणतात की, २ जानेवारी १९६१ महाराष्ट्र पोलीस दल स्थापन झाले वर, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्य पोलीस दलाला आजच्या तारखेला ध्वज प्रदान केला, यानिमित्ताने आम्हाला आज पोलीस दलाप्रती ऋण व्यक्त करण्याची संधी मिळाली,
*यावेळी संस्थापक अध्यक्ष पेडणेकर यांच्या मित्र मंडळाचे अविनाश गावडे, भगवान कासले, लक्ष्मण महाडीक, प्रसाद पाताडे, बाबुराव घाडिगावकर, सईद नाईक, जमिल कुरैशी, हेमंत नाडकर्णी, प्रसाद उगवेकर, सचिन कुवळेकर, यांच्या सहित सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते,