*कोंकण Express*
*प्रभू श्री रामाच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह निर्माण करणाऱ्या काँग्रेसी चायनीज हिंदुत्वाची आम्हाला गरज नाही*
*आमदार नितेश राणे यांची ठाकरे,राऊत ,आणि काँग्रेस वर टीका*
*ठाकरे,राऊत यांनी काँग्रस ची हुजरेगिरी करण्यापेक्षा सेवा दलाची टोपी घालून सलाम ठोकावा*
*पाकिस्तानची भूमिका उबाठा वाले राबवतात,केली टीका*
*कणकवली ः प्रतिनिधी*
ज्या काँग्रेस पक्षाने पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत प्रत्येक क्षणाला राम मंदिराला विरोध केला. ज्यांनी रामाच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह निर्माण केला. त्यांना राम मंदिराच श्रेय संजय राऊत चा अग्रलेखातून दिलं जात म्हणजे हा चाटुगिरी चा उच्चांक आहे. आणि हिंदू धर्माशी गद्दारी केली जातेय. आमच्या हिंदू देवदेवतांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात अशा चायनीज मॉडेलची हिंदू धर्माला गरज नाही.आणि अशी हुजरेगिरी करण्यापेक्षा काँग्रेसच्या सेवा दलाची अधिकृत टोपी घाला, आणि राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासमोर सलाम ठोकण्यासाठी उभे रहा. अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली.
संजय राजाराम राऊत त्यांनी स्वतःच्या पगारापुरतेच बोलले पाहिजे अशी टीका करताना आमदार नितेश राणे म्हणाले,दहा जनपथ चा अधिकृत पगारी नोकर आणि गुलाम झालेल्या संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक यांनी महायुतीच्या सत्ताधारी नेत्यांना दिल्लीच्या ताटाखालील मांजर बोलणं म्हणजे फार मोठा जोक आहे. सकाळची चहा प्यायची कि कॉफी प्यायची हे दिल्ली आणि दहा जनपथ च्या आदेशाशिवाय जे करत नाहीत त्यांनी दुसऱ्यांवर बोट ठेवायचं हे फार मोठ आश्चर्य आहे. आज सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस आपल्या न्याय यात्रेमध्ये व्यस्त आहे. म्हणून उद्धव ठाकरे त्याच्यासाठी फोना – फोनी करत आहेत. नितीश कुमार ला फोन केलाय.
म्हणजे आता दहा जनपथमध्ये आणखी नवीन दोन कारकून नेमले आहेत अस दिसतंय.अशा शब्दात खिल्ली उडविली. महानंदा डेअरीबाबत अफवा पसरवण्याचे काम तो बेबी पेंग्विन आणि संजय राऊत करत आहे. अफवा पसरवण्याचा हा त्यांचा धंदाच झालेला आहे. ना तो पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेला किंवा महानंदा गुजरातला जाणार असं असे त्यांनी सांगितले.
तुम्हाला अदानी समूह चालत नाही. पण तुझ्या मालकाला आणि आदित्य ठाकरेला रोमन खेरा,पुण्या पारेख, राहुल गोंश कसा चालतो. इतर अमराठी लोक चालतात, संध्याकाळच्या ग्लास पुसतांना गुजराती लोक चालतात मग उगाच महायुतीच्या सरकारवर टीका कशासाठी करता. आता विकासाची जबाबदारी महायुतीच्या सरकारवर आहे. तुझ्या मालकाच्या मुलाने अनेक उपक्रम लालबाग च्या मुलांच्या नावाने केले होते ? कोविड च्या नावाखाली दारू पिणारा तुझ्या मालकाचा मुलगा आहे. तुझा मालक उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाला तेव्हा कोव्हिड च नाव पुढे करून भ्रष्टाचार केला मग अंगणवाडी सेविकांचा प्रश्न का सोडवला नाही ?
सिंधुदुर्गात होणारा पाणबुडी प्रकल्प इतके दिवस रखडाला त्याला आदित्य ठाकरे शिवाय कोणी जबाबदार नाही. नाकरता पर्यटन मंत्री मिळाला म्हणून पाणबुडी प्रकल्प रखडला. खासदार विनायक राऊत याने तेव्हा थोडी चावी फिरवली असती तर हा प्रकल्प इतक्यात पूर्ण झाला असता.
पाकिस्तानची भूमिका उबाठा वाले राबवत आहेत. त्यामुळे आता पायाखालची वाळू सरकल्याने ज्या ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून निघालेली विकसित भारत संकल्प यात्रा आहे त्याला विरोध करण्याचा केविलवाणी प्रयत्न करत आहेत.
२०१८ ला दिपक केसरकर अर्थराज्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी पाणबुडी प्रकल्पाची सुरुवात केली. आणि महाराष्ट्रातील पहिला पाणबुडीचा प्रकल्प आपल्या वेंगुर्ला सिंधुदुर्ग मध्ये येत होता. महाराष्ट्राला जो नाकरता पर्यटन मंत्री मिळाला ज्यांला मुंबईची नाईट लाईफ सोडून पर्यटन कळलंच नाही आणि त्यामुळे महाविकास आघाडीच सरकार असताना त्या प्रकल्पाला काही चालना भेटली नाही. त्यामुळे विनायक राऊत ने बोलू नये.आता त्या खासदाराला घरी स्थलांतर करण्याची वेळ आलेली आहे.
सुषमा अंधारे किंवा संजय राजाराम राऊत हे निवडणूक न लढवलेल्या शाळेतले विद्यार्थी आहेत, म्हणून त्यांनी निवडणुकीवर भाष्य करू नये असा उपरोधी टोला आ. नितेश राणे यांनी लगावला. तसेच उद्धव ठाकरेंनी २०१९ ला उद्धव ठाकरे भाजप युतीत येणार होते यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, संजय राऊत ला तेव्हा पगार पवारांकडून यायचा. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी धृतराष्ट्राच्या भूमिकेतून बाहेर याव. नाहीतर उरली सुरली उबाठा गुंडाळण्याची वेळ हा संजय राजाराम राऊत आणणार आहे. असा खळबळजनक टोलाही त्यांनी लगावला आहे.