*कोंकण Express*
*मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचा आमदार नितेश राणे यांनी केला सत्कार*
*मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना केली जाते तातडीची मदत*
*आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारचे मानले आभार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांचे मदती साठीचे प्रस्ताव तातडीने मंजूर करून तत्परता दाखवणारे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख श्री मंगेश चिवटे यांचा भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी सत्कार केला. मंगेश चिवटे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना कणकवलीत प्रहार भवन येथे आमदार नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान आमदार नितेश राणे यांनी त्यांचा शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जिल्ह्यातील जनतेला केल्या जात असलेल्या मदतीबद्दल राज्य सरकारचे आभार ही व्येक्त केले.
मुख्यमंत्री सहायता निधी मधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांचे प्रस्ताव जेव्हा मुंबई मंत्रालयात जातात तेव्हा राज्य सरकारकडून अशा रुग्णांना तातडीची आर्थिक मदत केली जाते. या सर्व प्रक्रियेत श्री. मंगेश चिवटे हे नेहमीच सहकार्याच्या भावनेतून या रुग्णांना न्याय देतात. त्याबद्दलही आमदार नितेश राणे यांनी आभार व्यक्त करत मनस्वी सत्कार केला.