देवगड तळवडे सरपंच गोपाळ रुमडे यांनी केला भाजपात प्रवेश

देवगड तळवडे सरपंच गोपाळ रुमडे यांनी केला भाजपात प्रवेश

*कोकण Express*

*देवगड तळवडे सरपंच गोपाळ रुमडे यांनी केला भाजपात प्रवेश*

*आमदार नितेश राणे यांनी केले पक्षात स्वागत*

*कणकवली ः प्रतिनिधी*

देवगड तळवडे सरपंच गोपाळ सूर्यकांत रुमडे यांनी भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला. कणकवली येथे हा पक्षप्रवेश झाला. यावेळी शक्ती केंद्रप्रमुख तथा माजी सरपंच पंकज दूखंडे, गडीताम्हाणे शक्ती केंद्रप्रमुख अमित कदम आदी उपस्थित होते.सरपंच गोपाळ रुमडे हे अपक्ष म्हणून निवडून आले होते.
आमदार नितेश राणे यांच्या कामाचा झंझावात, त्यांची विकास कामाबद्दलची दूरदृष्टी पाहून आपण प्रभावित झालो आहे. देवगड तळवडे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करणे गरजेचे आहे. आणि म्हणूनच मी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करत असल्याचे सरपंच गोपाळ रूमडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!