शहर शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

शहर शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

*कोकण Express*

*शहर शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी…!*

*कणकवली ः प्रतिनिधी* 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती कणकवली शहर शिवसेनेच्या वतीने कणकवली नूतन शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यलयात शनिवारी साजरी करण्यात आली.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस जिल्हाबँकेचे अध्यक्ष सतीश सावंत व शिसवेना नेते अतुल रावराणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. बाळासाहेबांनी १९ जून १९६६ साली शिवसेना पक्षाची स्थपना केली.आपल्या मराठी माणसावर होणार्या अन्यायाला वाचा फोडून मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी  पक्ष स्थापन केला. आपल्या व्यंगचित्रातून ,वक्तृत्वातून तसेच कार्याच्या माध्यमातून लोक जागरणाची धुरा त्यांनी सांभाळली.त्यांचे विचार आजही शिवसैनिकाला प्रेणादायी आहेत असे सांगत सतीश सावंत यांनी अभिवादन केले.तसेच शैवसैनिकांनी घोषणाबाजी केली.उपस्थितांना जिलेबी,केळी वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये,तालुका प्रमुख शैलेश भोगले,जिल्हाप्रमुख नीलम सावंत- पालव,नगरसेवक सुशांत नाईक,कन्हैया पारकर,संदेश पटेल,युवासेना जिल्हाप्रमुख गीतेश कडू,राजू राठोड,अँड हर्षद गावडे,शेखर राणे,विलास कोरगावकर,मीनल तळगावकर,माधवी दळवी,अनुप वारंग,विलास गुडेकर,तेजस राणे,सोमा गायकवाड,सौ,.घाडीगावकर,ललित घाडीगावकर,प्रसाद अंधारी,योगेश मुंज,सिद्धेश सावंत आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!