*कोकण Express*
*विद्यामंदिर हायस्कूल लोरे -वाघेरी, प्रशालेचा “वार्षिक क्रीडा महोत्सव” उत्साहात संपन्न*
शालेय समिती अध्यक्ष मा.श्री .मनोजजी रावराणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली प्रशालेच्या क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर संस्था सचिव श्री .प्रकाश रावराणे, संचालक सदस्य- श्री.अनमोल रावराणे, श्री. दामोदर नारकर, श्री.सुनील रावराणे,श्री. गुरुनाथ राणे,श्री.सुनील रावराणे,लोरे सरपंच श्री.अजय रावराणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.महेश पाटील, श्री.महेश राणे, मुख्याध्यापक श्री. देसाई एस. व्ही. उपस्थित होते.
पालक, विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमास मार्गदर्शन करताना व शुभेच्छा देताना, श्री.अनमोल रावराणे यांनी खेळाचे महत्व विद्यार्थ्यांना विषद केले तर अध्यक्षीय भाषणातून शुभेच्छा देताना श्री. मनोजजी रावराणे यांनी शिक्षणाबरोबरच खेळातून आपल्यासारख्या ग्रामीण भागातील मुलांनी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नाव कमवावे यासाठी सर्वतोपरी सहकार्याची आपली भूमिका स्पष्ट केली.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व गौरव करण्यासाठी आकर्षक चषक संचालक सदस्य श्री. संतोष कदम यांनी आपल्या दातृत्वातून उपलब्ध करून दिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. देसाई एस. व्ही.तर आभार श्री. गोसावी ए.पी.यांनी मानले.