वेंगुर्ला नगरपरिषद येथे “विकसित भारत संकल्प यात्रा” कार्यक्रम संपन्‍न

वेंगुर्ला नगरपरिषद येथे “विकसित भारत संकल्प यात्रा” कार्यक्रम संपन्‍न

*कोंकण Express*

*वेंगुर्ला नगरपरिषद येथे “विकसित भारत संकल्प यात्रा” कार्यक्रम संपन्‍न*

भारत सरकारने “विकसित भारत संकल्प यात्रा” या नावाची देशव्यापी मोहिम दिनांक १५ नोव्हेंबर ते दिनांक २६ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये सुरू केली आहे. भारत सरकारच्या प्लॅगशिप योजनांचे लाभ लाभार्थ्यापर्यंत विहीत वेळेत पोहोचवण्याच्या उद्देशाने “विकसित भारत संकल्प यात्रा” ही मोहिम राबविण्‍यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत विविध योजनांबद्दल जनजागृती करणे, सरकारी योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी सुसंवाद साधणे तसेच या मोहिमेदरम्यान संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे इ. उद्दीष्टे साध्य करावयाची आहेत.
“विकसित भारत संकल्प यात्रा” अभियान रथाचे आगमन वेंगुर्ला नगरपरिषदेच्‍या मुख्‍य बाजापेठेतील क्रॉफर्ड मार्केट येथे शुक्रवार दिनांक ३० डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता झाले. यावेळी केंद्र शासनाच्या पी.एम.स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्वला गॅस, प्रधानमंत्री विश्‍वकर्मा योजना, आयुष्यमान कार्ड शिबिर, प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना, आधारकार्ड अद्यावत करणे यासारख्या विविध योजनेची माहिती व लाभ देणारे स्टॉल उभारण्यात आलेले होते तसेच आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आलेले होते.
या कार्यक्रमाचा शुभारंभ उपस्थित मान्‍यवरांचे हस्‍ते दीपप्रज्‍वलन करुन आणि मुख्‍याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांच्‍या हस्‍ते श्रीफळ वाढवून करण्‍यात आला. याप्रसंगी पोलीस निरिक्षक श्री. अतुल जाधव, आरोग्‍य अधिकारी डॉ. सुप्रिया रावळ, बॅक ऑफ महाराष्‍ट्रचे शाखा व्‍यवस्‍थापक श्री. राजेंद्र वेळकर, जिल्‍हा उदयोग केंद्राचे व्‍यवस्थापक श्री. रविंद्र पत्‍की, प्रशासकीय अधिकारी सौ. संगिता कुबल, माजी नगराध्‍यक्ष श्री.दिलीप गिरप, माजी नगरसेवक श्री. सुहास गवंडळकर, श्री. प्रशांत आपटे, श्री. धर्मराज कांबळी, सौ. श्रेया मयेकर, सौ. सुषमा प्रभूखानोलकर , पत्रकार, व विविध योजनांचे लाभार्थी व शहरातील बहुसंख्‍य नागरीक उपस्थित होते.
विकसित भारत संकल्‍पनेच्‍या उद्दिष्‍टपूर्तीसाठी शासनामार्फत लागू करण्‍यात आलेल्‍या विविध कल्‍याणकारी योजनांची जनजागृती करण्‍यासाठी तसेच सदर योजनेबाबत नागरीकांच्‍या विविध अडचणी जाणून घेवून त्‍यांचे निराकरण करुन जास्‍तीत जास्‍त लाभार्थ्‍यांना शासनाचे लाभ मिळवून देण्‍यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेच्‍या नागरी सुविधा केंद्रामध्‍ये नियमितपणे एक खिडकी कार्यन्वित करण्‍यात येईल तसेच आज या ठिकाणी विविध शासकीय कार्यालयांमार्फत उभारण्‍यात आलेल्‍या स्‍टॉलवर प्रत्यक्ष भेट देवून योजनांबाबत माहिती घ्‍यावी व जास्‍तीत जास्‍त नागरीकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्‍यावा असे आवाहन मुख्‍याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांनी केले.
यानंतर यावेळी केंद्र शासनाच्या पी.एम.स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्वला गॅस, प्रधानमंत्री विश्‍वकर्मा योजना, प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत विविध लाभार्थ्‍यांना उपस्थित मान्‍यवरांच्या हस्‍ते प्रमाणपत्र/धनादेश/गॅस शेगडी इ. वितरण करण्‍यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक मुख्‍याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांनी केले तसेच सुत्रसंचालन श्री. वैभव म्हाकवेकर यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!