राष्ट्रीय काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी देवगड तालुक्याला भेट देऊन पदाधिकारी यांच्याशी साधला संवाद

राष्ट्रीय काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी देवगड तालुक्याला भेट देऊन पदाधिकारी यांच्याशी साधला संवाद

*कोंकण Express*

*राष्ट्रीय काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी देवगड तालुक्याला भेट देऊन पदाधिकारी यांच्याशी साधला संवाद*

*देवगड ः प्रतिनिधी*

राष्ट्रीय काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी देवगड तालुक्याला भेट देऊन राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकारी यांची संवाद साधला यावेळी पक्षसंघटना बांधणी ,आगामी लोकसभा, विधांनसभा, जिल्हा परिषद,पंचायत समिती, निवडणूक बाबत चर्चा केली .राजापूरचे माजी आमदार हुसनबानू खलीपे, जिल्हा अध्यक्ष इर्शाद शेख ,माजी अध्यक्ष विकास सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सचिव उल्हास मणचेकर,यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच देवगड जामसंडे शहर अध्यक्ष पदी विनायक रामचंद्र म्हापसेकर याना नियुक्ती पत्र देऊन शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश देवगडकर,प्रभाकर कदम,बाबुराव घाडीगांवकर रविंद्र डगरे, भगवान कासले,प्रसाद पाताडे,सईद नाईक उपस्थित होते.
या भेटीच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ च्या वतीने जाहीर करण्यात आलेला देवगड तालुका आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त दै.रत्नागिरी टाइम्सचे प्रतिनिधी यांचा विशेष सत्कार देवगड तालुका काँग्रेसच्या वतीने राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!