*कोंकण Express*
*उबाठा पक्षच काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव; आमदार नितेश राणे*
*संजय निरुपम ठाकरे वर टीका करून राजकारणात कचरा कसा करतात हे दाखवून दिले*
*अमोल कोल्हे नी अजित दादा च्या खाल्या मिठाची जाण ठेवावी
*कणकवली ः प्रतिनिधी*
राजकारणात कचरा कसा केला जातो याचे उत्तम उदाहरण म्हणजे संजय निरुपम यांनी काल दिले. संजय निरुपम यांनी उबाठा आणि उद्धव ठाकरे यांची लायकीच काढली आहे. काँग्रसने उद्धव ठाकरेंची क्षमता चांगलीच ओळखली आहे. आणि म्हणूनच उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. हे खोटे असल्यास उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी स्व.बाळासाहेबांची शपथ घेऊन खुलासा करावा असे आव्हान भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिले.
कणकवली प्रहार भवन येथे इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी संवाद साधताना आमदार नितेश राणे बोलत होते. ते म्हणाले, उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करा असा प्रस्ताव काँग्रेस कडून आलेला आहे. ते पहा आता पाच जागा मिळताना काठीन झालेल्या ठाकरेंना पक्षाच पक्षच विलीन करण्याची ऑफर आलेले आहे असा घणाघात आमदार नितेश राणे यांनी केला. तर प्रकाश आंबेडकर यांचा विषय महत्वाचा नाही, असं संजय राऊत यांनी इंडि अलायन्सच्या बैठकीत सांगितले.यातून प्रकाश आंबेडकर यांना कमी लेखायचे आणि त्यांची सार्वजनिक इंडी मध्ये लायकी नसल्याचे अप्रत्यक्ष सांगायचे अशा काड्या लावण्याचे काम आजपर्यंत संजय राऊत करत आला आहे.
तसेच राम मंदिरच्या निमंत्रणावरून बोलताना राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंच नाव दिसणार नाही. असा शाप राम देवता देईल असा घणाघात देखील आमदार नितेश राणे यांनी केला. अमोल कोल्हे यांच्याबाबत टीकेला आमदार नितेश राणे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. ते म्हणाले, पैसे घेऊन संभाजी महाराजांची भूमिका करणाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलू नये. तर ज्या अजित पवार यांच्या आशीर्वादाने अमोल कोल्हे खासदार झाले. त्यांनी विचार करून बोलावे.खाल्या मिटाला जगावे अन्यथा माजी खासदार हे नाव लागायला वेळ लागणार नाही. असा टोलाही आ. नितेश राणे यांनी लगावला. येणाऱ्या निवडणुकांच्या जागा वाटपावर वरिष्ठ निर्णय देतील असेही आ. राणे म्हणाले.
आम्हाला हिंदू धर्मातील देव देवतांचे व्हिडीओ लावण्यासाठी जो खर्च करण्याची संधी मिळतेय ते आमचं भाग्य आहे. सुप्रिया ताईंनी लव्ह जिहादप्रमाणे राम मंदिरला पण जिव्हाळा लावावा, असाही टोला श्री. राणे यांनी लगावला.